हातावर प्रेम करणाऱ्यांसाठी' 'बिसलरी हँड प्युरीफायर्स'ची नाविन्यपूर्ण मालिका सादर

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

हातावर प्रेम करणाऱ्यांसाठी' 'बिसलरी हँड प्युरीफायर्स'ची नाविन्यपूर्ण मालिका सादर

मुंबई, : बिसलरी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडने व्यक्तिगत निगा विभागात प्रवेश करत बिसलरी हँड प्युरीफायर्स सादर करत असल्याचे जाहीर केले. बिसलरीने नेहमीच ग्राहकांच्या गरजांवर लक्ष केंद्रित केले आहे आणि आपल्या नवीन आरोग्य स्वच्छता साधनांच्या मालिकेतून विश्वास, आरोग्य आणि सुरक्षितता या मुल्यांप्रती असलेली आपल्या ब्रँडची पत विस्तारली आहे.

ग्राहक आता आरोग्य आणि स्वच्छता या गोष्टींविषयी अधिकाधिक जागरूक होत असताना महामारीच्या सुरुवाती पासूनच सॅनिटायझर ही गरजेची गोष्ट बनली आहे. पण सातत्याने सॅनिटायझरचा वापर केल्यामुळे ग्राहकांना त्वचेवर दुष्परिणाम दिसायला सुरुवात झाली. त्वचा कोरडी आणि खडबडीत व्हायला लागली. बिसलरी हँड प्युरीफायर्स ची मालिका ही नियमीत वापरासाठीच तयार करण्यात आली असून त्याद्वारे जंतूंपासून ९९.% सुरक्षितता पुरविली जात आहे. जोडीला कोरडेपणा पासून बचाव करत तुमची त्वचा मऊ, मुलायम ठेवण्यासही मदत होणार आहे.
जेल आणि बहुउद्देशीय स्प्रे प्रकारातील बिसलरी हँड प्युरीफायर्सची मालिका वैयक्तिक वापराच्या आणि प्रवासातील विशेष गरजांची पूर्तता करते. कोरफड, ग्लीसेरॉल आणि -जीवनसत्वाने जेल समृद्ध आहे. त्यामुळे हात मॉईश्चराईज्ड आणि मुलायम राहायला मदत होते. जेल ५०,१०० आणि २०० मिली एसकेयू मध्ये उपलब्ध आहे. बहुउद्देशीय स्प्रे मालिकेतील घटक हे हात आणि सर्व प्रकारच्या पृष्ठ्भागांसाठी चालणार असून १०० आणि २०० मिली स्प्रे बाटल्यांमध्ये उपलब्ध आहेत.
बिसलरी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.एन्जेलो जॉर्ज या सादरीकरणाच्या वेळी बोलताना म्हणाले, “वाढत्या आरोग्य आणि स्वच्छता विषयक जागरूकतेमुळे व्यक्तिगत स्वच्छता निगा विभागात मोठी उत्साहवर्धक वाढ होत आहे. आम्हालाही ग्राहक संशोधन केल्यानंतर ही गोष्ट लक्षात आली की जंतूंपासून संरक्षण देण्याच्या पलीकडे जाऊन जोडीला मॉईश्चरायझेशन आणि सुवासिक तजेला देणाऱ्या उत्पादनांची ग्राहकांना गरज आहे. सर्वोत्तम प्रकारच्या पॅकेजिंग मधून हे सुधारित घटक देणारे बिसलरी हँड प्युरीफायर्स आम्ही विकसीत केले आहेत. देशभरातल्या आमच्या वितरण पोहोच यंत्रणेच्या मदतीने बिसलरी हँड प्युरीफायर्सची ही उत्साहवर्धक मालिका आघाडीच्या जनरल ट्रेड दालनात, फार्मसीज, आधुनिक ट्रेड दालने आणि -कॉमर्स साईट्स वर उपलब्ध आहे.