सुधागडात दुर्मीळ वन्यजिवांची तस्करी करणार्‍या तस्करांचा सुळसुळाट

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

सुधागडात दुर्मीळ वन्यजिवांची तस्करी करणार्‍या तस्करांचा सुळसुळाट

पाली-बेणसे : सुधागड तालुक्यात अंधश्रध्दा, काळीजादू, व औषधासाठी दुर्मीळ वन्यजिवांची तस्करी करणार्‍या तस्करांचा सुळसुळाट झाल्याचे समोर आले आहे.  गुरुवारी पाली सुधागड  वनविभागाने खवल्या मांजराची तस्करी करणार्‍या तस्करास पकडले. या गुन्ह्यात चार आरोपीना वनविभागाने अटक केली असून त्यांच्याजवळील मुद्देमाल देखील जप्त केला आहे. सुधागड वनविभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार उपवनसंरक्षक आशिष ठाकरे व सहाय्य क वनरक्षक संजय कदम यांचे मार्गदर्शनाखाली सुधागड वनपरिक्षेत्र अधिकारी समीर शिंदे व कर्मचारी यांनी सापळा रचून ही कारवाई केली. नाडसुर ते जांभुळ पाडा रोडवर दोन संशयित मोटारसायकल थांबवून मोटारसायलस्वार इसम यांची चौकशी केली असता अनिल भागू वाघमारे यांचे पाठीवर असलेली बॅग तपासली असता बॅग मध्ये झाकून ठेवलेले खवल्या मांजर आढळून आले.वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 च्या अनुसूचि 1 मधील वन्यजीव खवले मांजर व 1 पिल्लू वनविभागाने जप्त केले. या प्रकरणी गाडीवर असणारे आरोपी दशरथ लक्ष्मण वालेकर, रा झाप आदिवासी वाडी, हिरामण बेंडु हिलम, रा. कुंभारशेत, अनिल भागू वाघमारे, रा. चावसर पुणे, रमेश अंकुश जाधव रा.वांद्रे, ता मुळशी, यांना ताब्यात घेतले. तसेच त्यांचे ताब्यात असणारे मोटारसायकल क्र . एम एच 06 वाय 2564 व एम एच 06 बी बी 9253 या गाड्या देखील ताब्यात घेतल्या, व या गुन्ह्यातील आरोपींविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 9, 39(3), 44 (1)(अ), 48 (अ), 49, 50, 51, 51 (अ) अन्वये कळंब रौ गु र नं डब्ल्यू एल 01/ 2021/22 दि. 06/05/ 2021 ची नोंद करून आरोपीना अटक करण्यात आले आहे.  सुधागड तालुक्यात दुर्मीळ प्रजातीचे व करोडे रुपये किमतीचे मांडुळाची तस्करी करणार्‍यांना यापूर्वी   बेड्या ठोकल्या होत्या. तसेच बिबट्याच्या नख्यांची तस्करी करणार्‍यांना देखील वनविभागाने पकून कारवाई केली होती. त्यामुळे सुधागड तालुका दुर्मीळ वन्यजिव प्राणी व त्यांच्या अवशेषांची तस्करी करणारे केंद्र बनले आहे. यावर शिक्कामोर्तब झाले आहे. या कारवाईनंतर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक होत आहे.