मुंबईत कोरोना लसीकरणाला वारंवार ब्रेक, तिसरी लाट कशी रोखणार?

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

मुंबईत कोरोना लसीकरणाला वारंवार ब्रेक, तिसरी लाट कशी रोखणार?

मुंबईमुंबईत कोरोना लसींचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर दोन दिवस लसीकरण केंद्र बंद आहेत. केंद्र सरकारकडून पालिकेला पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध होत नसल्याने लसीकरण केंद्र बंद ठेवावी लागत आहेत असं प्रशासनाच म्हणणं आहे. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट मुंबई महापालिका कशी रोखणार? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. (Mumbai Corona Vaccination has been closed how to stop the third wave of corona BMC Additional Commissioner Suresh Kakani)

मुंबईत कोरोना लसीकरणाला ब्रेक

मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत गेल्या तीन दिवसांपासून लसीकरण बंद आहेकोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या आधी जास्तीत जास्त लसीकरण होणं गरजेचं आहे. मात्र असे असतानाही मुंबईत कोरोना लसीकरणाला ब्रेक लागत आहे. त्यामुळे मुंबई महापालिका कोरोनाची तिसरी लाट कशी रोखणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कोरोनाची तिसरी लाट कशी रोखणार?

मुंबईत कोरोना लसींचा अपुरा पुरवठा होत आहे. त्यामुळे वारंवार लसीकरण बंद होत आहे. कोरोना रोखण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण होणं गरजेचं आहे. कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी देखील लसीकरण महत्वाचं आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणं आहे.

पण केंद्र सरकारकडून पालिकेला पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध होत नसल्याने लसीकरण केंद्र बंद ठेवावी लागत आहेत अस प्रशासनाच म्हणणं आहे. त्यामुळे मुंबईत कोरोनाची तिसरी लाट कशी थोपवता येईल? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.