कानपूर भीषण अपघातात 17 जणांचा मृत्यू,18 जखमी

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

कानपूर भीषण अपघातात 17 जणांचा मृत्यू,18 जखमी

कानपूर : उत्तरप्रदेशातील कानपूर येथे मंगळवारी रात्री भरधाव टेम्पो आणि लखनऊहून दिल्लीकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बसची धडक होऊ भीषण अपघात झाला. या अपघातात 17 जणांचा मृत्यू झाला असून 18 जण जखमी झालेत. कानपूर येथील सचेंडी पोलीस स्टेशन अंतर्गत रतन खेडा येथे कानपूर-इटावा महामार्गावर हा अपघात झाला

यासंदर्भात कानपूरचे पोलिस निरीक्षक मोहित अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री हामार्गावर भरधाव बसला टेम्पोने पाठिमागून धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की, टेम्पो महामार्गाच्या किनाऱ्यावर जाऊन उलटला. तर धडक बसल्यामुळे ट्रॅव्हल्स अनियंत्रित होऊन उलटली. अपघाताची माहिती मिळातच घटनास्थळी स्थानिक नागरिक, पोलिसांनी मदतीसाठी धाव घेतली. जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमीपैकी अनेकजण हे येथील बिस्कीटच्या कारखान्यामध्ये काम करणारे कामगार आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला तपास पोलीस करत आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अपघातासंदर्भात दु: व्यक्त करतानाच मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येक 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनीही दुःख व्यक्त केलेय

केंद्र सरकारकडूनही मदत जाहीर 

 उत्तर प्रदेशच्या कानपुर येथे झालेल्या मार्ग अपघातावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीव्र शोक व्यक्त केला. यासंदर्भातील ट्वीटर संदेशात पंतप्रधान म्हणाले की, या अपघातातल्या मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी आहोत. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी. या अपघातातल्या मृतांच्या नातेवाईकाला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपयांची तर जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत पंतप्रधानांनी जाहीर केली आहे.