केडगावमध्ये रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

केडगावमध्ये रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

अहमदनगर :- कोरोना महामारीत निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा भरुन काढण्यासाठी जय बजरंग प्रतिष्ठान भाऊ कोतकर मित्र मंडळाच्या वतीने केडगाव शिवाजीनगर येथे रक्तदान शिबीर घेण्यात आले.या शिबीरात युवकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.   या शिबीराचे उद्घाटन मनपा स्थायी समितीचे आजी-माजी सभापती अविनाश घुले मनोज कोतकर यांच्या हस्ते झाले.प्रतिक कोतकर यांनी आपल्या वाढदिवसाच्या सर्व खर्चाला फाटा देत हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.

18 ते 45 वयो गटातील युवक-युवतींचे कोरोना लसीकरण होत आहे.ही लस घेतल्यानंतर सुमारे 60 दिवस रक्तदान करता येत नसल्याने युवकांनी रक्तदान करुन लस घेण्याचे आवाहन करण्यात आले होते.या आवाहनाला प्रतिसाद देत मोठ्या संख्येने युवकांनी रक्तदान केले.