शेवटच्या श्वासापर्यंत पंकजा मुंडे भाजपातच राहतील – सुधीर मुनगंटीवार

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

शेवटच्या श्वासापर्यंत पंकजा मुंडे भाजपातच राहतील – सुधीर मुनगंटीवार

मुंबई : शिवाय, ओबीसी मोर्चाच्या बैठकीस पंकजा मुंडे यांची अनुपस्थिती दिसल्याने, नव्या चर्चांना उधाण आलं आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी महत्वपूर्ण विधान केलं आहे.

”कार्यकर्ते जे पक्षावरही प्रेम करतात व कधीकधी पक्षातील विशिष्ट नेत्यावर इतर नेत्यांच्या तुलनेत थोडं जास्त प्रेम करतात. तर, अशा काही कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, लोकप्रतिनिधींनी राजीनामा दिला, हा राजीनामा दिल्यानंतर पंकजा मुंडे यांनी त्यांना समजावताना काही शब्दांचा उपयोग केला असेल, पण त्याचा अर्थ त्या नाराज आहेत असं मला वाटत नाही. शेवटच्या श्वासापर्यंत पंकजा मुंडे या पक्षाच्या बाहेर जाण्याचा विचार देखील करू शकत नाही. असं भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.” असं भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार एबीपी माझाशी बोलाताना म्हणाले आहेत. 

पंकजा मुंडे या भाजपाच्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत आणि केवळ याच जन्मात नाही तर पुढील जन्मातही त्या भाजपातच राहातील. भाजपामध्ये आपलं म्हणणं मांडणं म्हणजे नाराजी नाही, असंही सुधीर मुनगंटीवार म्हणाले असल्याचं सांगण्यात आलं आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळात प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्याने पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या असतानाच त्यांच्या काही समर्थकांनी भाजपामधील पदांचे राजीनामे दिले होते.तर, दिल्लीतून मुंबईत परत येताच राजीनामे दिलेल्या कार्यकर्त्यांशी पंकजा मुंडे यांनी संवाद साधला. संवाद साधत असताना पंकजा मुंडे यांनी कोणाच्याही नावाचा उल्लेख केला नसला तरीही भाजपा नेतृत्वावरील त्यांची नाराजी लपून राहिली नसल्याचे दिसून आले.

तर,वैद्यनाथ साखर कारखान्याचे बँक खाते गोठवल्याप्रकरणात पंकजा मुंडे समर्थकांनी पुन्हा एकदा नाराजीचा सूर आळवला आहे. कारखान्याच्या आडून पंकजा मुंडेंना बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप समर्थकांनी केला आहे.