मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारी कोकण दौऱ्यावर

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारी कोकण दौऱ्यावर

मुंबई : तौक्ते  चक्रीवादाळाचा तडाखा बसल्याने कोकण किनारपट्टीचे मोठ्या प्रमाणात नुकसान
झाल्याने या भागाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारी वादळग्रस्त भागाच्या

दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे सरकारी नियमांप्रमाणे मिळणाऱ्या मदतीबरोबरच
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर अतिरिक्त मदतीची घोषणा होण्याची शक्यता आहे.
तौक्ते  चक्रीवादाळाचा तडाखा सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे या जिल्ह्यांना मोठ्या
प्रमाणात बसला आहे. या पार्श्वाभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत वादळामुळे झालेल्या
नुकसानीबाबत चर्चा झाली.
शेती, विद्युत यंत्रणा, मच्छीमार यांच्याबरोबरच अनेकांच्या घरांचेही मोठे नुकसान झाले आहे.
पंचनामे सुरू असून त्यानंतर प्रत्यक्ष नुकसानीचे चित्र समोर येईल, असे सांगण्यात आले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शुक्रवारी कोकणात पाहणी दौऱ्यावर जातील, असे सांगण्यात  आले.
 वडेट्टीवार कोकण दौऱ्यावर 
मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार हे उद्या गुरुवारपासून तौक्ते  चक्रीवादळाचा
तडाखा बसलेल्या कोकणचा तीन दिवसांचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते रायगड, रत्नागिरी
व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील काही भागांना भेटी देऊन वादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी
करणार आहेत.
वडेट्टीवार उद्यापासून म्हणजे २० ते २२ मे रायगडमधील माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन,
रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, राजापूर, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कु डाळ, मालवण,
वेंगुर्ला तालुक्यांचा तीन दिवस दौरा करून लोकांशी थेट संवाद साधून नुकसानीची माहिती घेणार
आहेत.