कच्च्या तेलाचे भाव प्रति बॅरल 75 डॉलरवर पोहोचले

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

कच्च्या तेलाचे भाव प्रति बॅरल 75 डॉलरवर पोहोचले

 कच्च्या तेलाचा बेंचमार्क ब्रेंट क्रूड सोमवारी पुन्हा 75 डॉलर प्रति बॅरलच्या पातळीवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे भारतासाठी ही चिंतेची बाब आहे. कारण भारतात आधीच पेट्रोल आणि डिझेलने शंभरी ओलांडली आहे. अशा परिस्थितीत जर कच्चे तेल अधिक महाग झाले, तर येत्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत 3 रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते. देशात जर पेट्रोल आणि डिझेल जीसटीच्या कक्षेत आले असते तर सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला असता. पण जीसटीच्या बैठकीत यावर साधी चर्चादेखील करण्यात आली नाही.

गेल्या 1 महिन्यात 9.1% महाग झाले कच्चे तेल
कच्च्या तेलाच्या बाजारात आजकाल तेजी दिसून येत आहे. या आठवड्यात कच्चे तेल 75.34 डॉलर प्रति बॅरलवर आले आहे. एका महिन्यापूर्वी हे भाव 69.03 वर होते. म्हणजेच गेल्या एका महिन्यात कच्चे तेलाचे भाव 9.1% ने वाढले आहे. विशेष म्हणजे डब्ल्यूटीआय क्रूडही यामागे आहे. डब्ल्यूटीआय क्रूडही या आठवड्यात 71.97 डॉलर प्रति बॅरलवर बंद झाले होते. जे गेल्या आठवड्यात 69.98 डॉलर प्रति बॅरल होते.

कच्चे तेल महाग का होत आहे?
केडिया कमोडिटीचे संचालक अजय केडिया म्हणतात की, जगभरातील कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये सातत्याने घट आणि लसीकरणाच्या वाढत्या गतीमुळे आर्थिक उपक्रमात वाढ झाली आहे. यामुळे इंधनाची मागणी झपाट्याने वाढत असून परिणामी कच्च्या तेलाचे भाव गगनाला भिडत आहेत. या व्यतिरिक्त, डॉलर निर्देशांक मजबूत झाल्याने रुपया कमकुवत झाला आहे. आपण एकूण उत्पन्नांच्या 80% पेक्षा जास्त क्रूड आयात करतो यासाठी डॉलरमध्ये पैसे द्यावे लागतात. अशा स्थितीत रुपया कमकुवत झाल्यामुळे कच्च्या तेलाची किंमत वाढत असल्याचे केडिया म्हणाले.