महसूलमंत्री थोरातांच्या पाठपुराव्याने संगमनेर तालुक्यात रस्त्यांकरिता 5 कोटींचा निधी मंजूर

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

महसूलमंत्री थोरातांच्या पाठपुराव्याने संगमनेर तालुक्यात रस्त्यांकरिता 5 कोटींचा निधी मंजूर

अहमदनग : राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका हा विकासाचे मॉडेल ठरला असून कोरोना संकटातही तालुक्याच्या विकासाची घोडदौड कायम राखतां ना महसूल मंत्री थोरात यांच्या सततच्या पाठपुराव्याने तालुक्यातील विविध रस्त्यांचे डांबरीकरण मजबुतीकरण यांसह इतर कामांसाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना इंद्रजीत थोरात म्हणाले की,मागील दोन वर्षापासून राज्यात कोरोनाचे संकट आहे.या संकटात शासनातून निधी मिळवणे अवघड असतानाही महसूलमंत्री थोरात यांनी संगमनेर तालुक्या तील विकास कामांना कायम प्राधान्य दिले आहे.वाडी-वस्तीवर विकासाची घोडदौड कायम राखतांना २५१५ योजनेअंतर्गत २०२०- २१ या आर्थिक वर्षासाठी लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरवणे कामासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मिळवला आहे.या अंतर्गत चिंचोली गुरव येथील माधव वस्ती सोनवणे रस्ता, वडझरी खुर्द येथील खालचा मळा रस्ता,तळेगाव दिघे बाळ पाटलाचीवाडी रस्ता,पळसखेडे कांडेकर वस्ती रस्ता,-हे,चिकणी पाटी ते मोठेबाबा मंदिर,वडझरी खुर्द,तिगाव,माळेगाव हवेली,मालुंजे,धांदरफळ बुद्रुक,वेल्हाळे,जाखुरी,पिंपरणे शिव रस्ता,राजापूर,पिंपळगाव कोंझिरा,वडगाव लांडगा,मेंढवण,हिवरगाव पावसा, नान्नज दुमाला,निमज,वडगाव पान,डोळासणे,पिंपळे,कासारा दुमाला,पानोडी,मालदाड,पिंपरणे,निळवंडे,निमगाव बुद्रुक,कवठे मलकापूर,या गावांमधील रस्त्यांचे मजबुतीकरण डांबरीकरण करण्यात येणार आहे.तसेच निमगाव टेंभी येथील स्मशा भूमी तर खर शिंदे येथील कब्रस्तान बांधणे,निमगाव बुद्रुक आश्वी बुद्रुक येथील स्मशानभूमी चे सुशोभिकरण करणे,अंभोरे येथील दशक्रिया विधी घाट बांधणे सुशोभीकरण,पारेगाव खुर्द येथील ग्रामपंचा यत कार्यालय,जवळे कडलग येथील हनुमान मंदिर संरक्षण भिंत यांसह विविध कामाचा समावेश आहे.सातत्याने विकासाचा ध्यास घेत महसूलमंत्री थोरात यांनी अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात मोठा विस्तिर्ण तालुका असले ल्या संगमनेर तालुक्यात अनेक विकासाच्या योजना राबवल्या आहेत.ग्रामीण भागात रस्त्यांचे मजबूत जाळे करताना विद्युत जाळेही निर्माण केले आहे.याचबरोबर शिक्षण,आरोग्य,पाणी या व्यवस्थाही निर्माण केल्या आहेत.या सर्व विकास कामांसह उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या निळवंडे कालव्यांच्या कामाची गती राखताना २०२२ पर्यंत हे काम पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा होत आहे.महसूलमंत्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर मधील सहकारी संस्था अत्यंत कार्यक्षम पणे काम करत असून या सहकारी संस्था मुळे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे.नव्याने होणाऱ्या रस्ते मजबूतीकरण डांबरीकरण मुळे मजबूत रस्त्यांचे जाळे निर्माण होणार असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांसाठी दळणवळणाची चांगली सुविधा निर्माण होत आहे.यामुळे संगमनेर तालुक्यातील सर्व गावांमध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या पाठपुराव्याला बद्दल अभिनंदन होत आहे.