यूएस ओपन : जोकोविचचे स्वप्न भंगले; डॅनिल मेदवेदेवला जेतेपद

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

यूएस ओपन : जोकोविचचे स्वप्न भंगले; डॅनिल मेदवेदेवला जेतेपद

नवी दिल्ली  : अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत रशियाचा दुसरा मानांकित डॅनिल मेदवेदेवने पहिल्या ग्रँडस्लॅम जेतेपदावर आपले नाव कोरले. डॅनिलने सर्बियाचा अग्रमानांकित खेळाडू नोव्हाक जोकोव्हिचचा पराभव केला. अंतिम फेरीत मेदवेदेवने जोकोविचचा -, -, - असा पराभव केला. या पराभवामुळे जोकोविचचे २१वे ग्रँडस्लॅम जेतेपद आणिकॅलेंडर स्लॅमहे दोन विक्रम पूर्ण होण्याचे स्वप्न भंगले.
जोकोविचने विजेतेपद मिळवले असते तर, त्याचे २१वे ग्रँड स्लॅम हे विक्रमी ठरले असते. तब्बल अडीच तास चाललेल्या या सामन्यात जोकोविच प्रत्येक सेटमध्ये मेदवेदेवच्या मागे राहिला. सामना संपल्यानंतर मेदवेदेव थकून कोर्टवरच झोपला. विजयानंतर डॅनिलने जोकोविचची माफी मागत माझ्यासाठी तुम्ही इतिहासातील महान टेनिसपटू आहात, असे मेदवेदेवने म्हटले.