राज्यांना कोरोना लसीच्या 54.04 कोटींपेक्षा अधिक मात्रा

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

राज्यांना कोरोना लसीच्या 54.04 कोटींपेक्षा अधिक मात्रा

नवी दिल्ली, : केंद्र सरकारने आतापर्यंत सर्व स्त्रोताद्वारे 54.04 कोटींपेक्षा जास्त (54,04,78,610) लसींच्या मात्रा राज्ये/ केंद्र शासित प्रदेशांना पुरवल्या आहेत.आणखी 1,09,83,510 मात्रा पुरवठ्याच्या मार्गावर आहेत.
वाया गेलेल्या मात्रांसह एकूण 52,00,96,418 मात्रा देण्यात आल्या आहेत.( सकाळी 8 वाजेपर्यंत उपलब्ध माहितीनुसार) याशिवाय लसीच्या 2.55 कोटी पेक्षा जास्त (2,55,54,533) शिल्लक आणि वापरलेल्या नाहीत अशा मात्रा राज्ये आणि केंद्र शासित प्रदेश आणि खाजगी रुग्णालयांकडे उपलब्ध आहेत.