निर्मला सीतारामन आत्मनिर्भर भारतासाठी कार्यरत : पंतप्रधान

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

निर्मला सीतारामन आत्मनिर्भर भारतासाठी कार्यरत : पंतप्रधान

नवी दिल्ली : जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांचे कौतुक केले. ट्वीटर द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, " केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, भारतीय अर्थव्यवस्थेत आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्याच्या कार्यात त्या अग्रस्थानी कार्यरत आहेत. आपणस प्रदीर्घ आणि आरोग्यपूर्ण आयुष्य लाभावे यासाठी प्रार्थना . "

निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात वाणिज्य ,कॉर्पोरेट –कंपनी व्यवहार राज्य मंत्री म्हणून सुरवार केली. त्यानंतर देशाच्या पहिल्या पूर्णकालीन महिला संरक्षण आणि अर्थमंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला . मोदी सरकारच्या दुस-या कार्यकाळात निर्मला सीतारामन यांना अर्थ मंत्रालायाची जबाबदारी देण्यात आली.

निर्मला सीतारामन सध्या कर्नाटक राज्यातून राज्यसभेच्या खासदार आहेत. तमिळ, इंग्रजी, तेलुगु, हिंदी, कन्नड भाषांवर त्यांचे प्रभुत्व आहे. निर्मला सीतारमण जवहालाल नेहरू विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी असून अर्थशास्त्र विषयात त्यांचे शिक्षण झाले आहे. निर्मला सीतारामन यांनी 2003-2005 काळात राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या म्हणून कार्य केले तसेच 2014 पर्यंत भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या म्हणूनही त्यांनी कार्य केले. सामाजिक माध्यमांवर विशेषतः महिलांमध्ये- युवा वर्गात त्या लोकप्रिय आहेत.