मेधा कुलकर्णींची भाजपा राष्ट्रीय महिला मोर्चाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती, मानले नेतृत्वाचे आभार

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

मेधा कुलकर्णींची भाजपा राष्ट्रीय महिला मोर्चाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती, मानले नेतृत्वाचे आभार

पुणे : भाजपा राष्ट्रीय महिला मोर्चाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल जेष्ठ भाजप नेत्या आणि माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी केंद्रीय आणि राज्यातील भाजप नेतृत्वाचे आभार मानले. सामाजिक माध्यमांद्वारे आपल्या भावना व्यक्त करताना मेधा कुलकर्णी म्हणाल्या,

त्या म्हणाल्या, "भाजपा राष्ट्रीय महिला मोर्चाच्या उपाध्यक्षपदी पक्षाने मला संधी दिली याबद्दल स्वतःला धन्य मानते आणि ही संधी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीअमित शहाराष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डाबी. एल. संतोषमाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसराष्ट्रीय महिला मोर्चा अध्यक्षा वनाथी श्रीनिवासन या सर्वांची ऋणी आहे.

विषेशतः मधल्या काळातील झाकोळून गेलेल्या मला यातून देवेंद्र फडणवीस यांनी बाहेर काढले. जबाबदारी दिलीकाम दिले. आयुष्यभर सामाजिक कामात असलेल्या व्यक्तीला काम नसेल तर ते ग्रहण वाटते. माझी निष्ठातळमळ त्यांनी आणि पक्षाने जाणली. त्याबद्दल त्यांचे आभार. माझ्या क्षमतेच्या अत्युच्च पातळी पर्यत मी काम करेनमाझ्या जबाबदारीला न्याय देण्याचा आणि महिलांच्या हक्कांसाठी काम करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरप्रदेशध्यक्ष चंद्रकात पाटीलविजया रहाटकरकांता नलावडेखा. गिरीश बापट आणि महाराष्ट्रातील सर्व नेते या सर्वांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन असेच नेहमी मिळावेमिळत राहील याची खात्री आहे. या सर्वांचे आभार. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी हे पद मी व्रत म्हणून उपयोगात आणेन. यातून मिळणारे समाधान हाच माझ्यासाठी मोक्ष असेल. म्हणूनच म्हणावेसे वाटते. धन्य भाग सेवा का अवसर पाया. चरणकमल की धूल बना मैं.. मोक्ष द्वार तक आया..."