‘या’ दिवशी प्रदर्शित होणार अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’ चित्रपट

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

‘या’ दिवशी प्रदर्शित होणार अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’ चित्रपट

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’ हा चित्रपट चर्चेत आहे. गेल्या वर्षी या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले होते. पण करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. आता हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार हे समोर आले आहे.

जॅकी भगनानी आणि अक्षय कुमारने इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करत ‘बेल बॉटम’ हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले आहे. ‘तुमचे मनोरंजन करण्यासाठी लवकरच येत आहोत. १९ ऑगस्ट २०२१ रोजी बेल बॉटम हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे’ या आशयाचे कॅप्शन अक्षय कुमारने दिले आहे. यापूर्वी ‘बेल बॉटम’ हा चित्रपट २७ जुलै रोजी चित्रपट गृहामध्ये प्रदर्शित होणार होता. पण करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. आता हा चित्रपट १९ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार असल्याचे समोर आले आहे. चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते.

दरम्यान, या चित्रपटात अक्षयसोबत अभिनेत्री हुमा कुरेशी, वानी कपूर, लारा दत्ता या अभिनेत्री स्क्रीन शेअर करणार आहेत. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार या वर्षात एकापेक्षा एक हिट चित्रपट देण्यास तयार आहे. येत्या काळात ‘सूर्यवंशी’, ‘पृथ्वी राज’, ‘बच्चन पांडे’, ‘अतरंगी रे’ ‘धूम 4’ हे त्याचे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.