सीबीएसई बारावी परीक्षेबाबत सुनावणी 3 जून पर्यंत स्थगित

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

सीबीएसई बारावी परीक्षेबाबत सुनावणी 3 जून पर्यंत स्थगित

नवी दिल्ली  : कोरोना साथरोगाचा प्रकोप पाहता सीबीएसई आणि सीआयएससीई द्वारे आयोजित बारावीची परीक्षा रद्द करावी अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलीय. या याचिकेवर उत्तर देण्यासाठी केंद्र सरकारने 2 दिवसांची मुदत मागितली आहे. त्यामुळे यासंदर्भातील सुनावणी 3 जून पर्यंत स्थगित करण्यात आलीय

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा दहावी बोर्डाची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. परंतु बारावी बोर्डाची परीक्षा केवळ स्थगित करण्यात आल्या आहेत. मात्र बारावीची परीक्षा देखील रद्द करावी आणि याचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा, अशी मागणी होत आहे. त्यातच सुप्रीम कोर्टात बारावीची परीक्षा रद्द करण्यासंदर्भात याचिका दाखल करण्यात आली आहे. ज्यावर मागील आठवड्यात शुक्रवारी (28 मे) सुनावणी होणार होती, परंतु ती टळली. आज या याचिकेवर पुन्हा एकदा सुनावणी झाली, जी पुन्हा एकदा टळली आहे. आता या याचिकेवरील पुढील सुनावणी 3 जून रोजी होणार आहे. याप्रकरणी आज, सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान बारावीच्या परीक्षेबाबत गेल्या वर्षीच्या धोरणावर यंदा देखील अंमलबजावणी केली पाहिजे. जर सरकार मागील वर्षाच्या आपल्या निर्णयापासून मागे हटत असेल तर त्यांनी ठोस कारण सांगावे, असे सुप्रीम कोर्टाने म्हटलेय सरकारच्या निर्णयानंतर आम्ही याचा तपास करु, असेही सुप्रीम कोर्टाने नमूद केले.