मध्य रेल्वेकडून प्रवाशांसाठी लवकरच करमणुकीची सुविधा

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

मध्य रेल्वेकडून प्रवाशांसाठी लवकरच करमणुकीची सुविधा

मुंबई : मुंबईकरांना आता लोकलमध्ये विनाअडथळा करमणुकीची सुविधा मिळणार आहे. ‘कंटेंट ऑन डिमांडअंर्तगत रेल्वेच्या डब्यातमीडिया सव्‍‌र्हरबसविला जाणार असून मोबाइलवर विनाअडथळा करमणुकीचा आनंद लुटता येईल. ही सुविधा जुलै २०२१ अखेर पासून लोकल प्रवाशांसाठी सुरू करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. यातून मध्य रेल्वेला वर्षांला कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न मिळणार आहे.

करोना काळात निर्बंध आल्यानंतर प्रवासी कमी झाले असले तरीही आजही अनेकांना उभ्यानेच प्रवास करावा लागतो. मात्र आता या प्रवासात ठरावीक कार्यक्र , चित्रपट, काही वाहिन्यांवरील कार्यक्र प्रवाशांना मोबाइलवर विनाअडथळा आणि इंटरनेट वापरता पाहता येतील. पुढील महिन्यापासून ही सुविधा कार्यान्वित होणार आहे. रेल्वेकडून याचे एका खासगी कं पनीला याचे काम देण्यात आले असून त्याची कुर्ला कारशेडमध्ये चाचणीही करण्यात आली आहे.

होणार काय?

सध्या १६५ लोकल मध्य रेल्वेच्या ताफ्यात असून यातील १० लोकलमध्ये करममुकीसाठी लागणारी यंत्रणा बसवण्यात आली आहे. अन्य लोकलमध्ये यंत्रणा बसवण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. याकरिता एक मोबाइल ॅप तयार करण्यात येत असून ते प्रवाशांना डाउनलोड करावे लागेल. लोकलमध्ये प्रवेश के ल्यानंतर या सेवेच्या कक्षेत येताच त्याद्वारे प्रवासी विना इंटरनेट विविध कार्यक्र मांचा आनंद घेऊ शकतील. ॅपच्या माध्यमातून आवडीचे चित्रपट, गाणी, मालिका, क्रि केट सामने यासह अनेक करमणुकीच्या सुविधा मिळतील.

पश्चिम रेल्वेमध्येही उपलब्ध..

मेल-एक्स्प्रेस गाडय़ांमध्ये ही सुविधा देण्यात येत आहे. मध्य रेल्वेवरील चेन्नई एक्स्प्रेसमध्ये ती सुरू करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. पश्चिम रेल्वेवरही  सुविधा सुरू के ली जाणार आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची धार्मिक, राजकिय आणि अश्लिल माहितीवर बंदी असेल. गरज नसेल तेव्हा प्रवासी उपलब्ध मोबाइल ॅप बंद करू शकतील.