एप्रिल 2021 मध्ये भारतात 6.24 अब्ज अमेरिकन डॉलरची थेट परकीय गुंतवणूक

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

एप्रिल 2021 मध्ये भारतात 6.24 अब्ज अमेरिकन डॉलरची थेट परकीय गुंतवणूक

नवी दिल्ली : थेट परकीय  गुंतवणूक  (एफडीआय) धोरणात सुधारणागुंतवणूकीची सुविधा  आणि व्यवसाय सुलभता या आघाड्यांवर केंद्र  सरकारने केलेल्या उपाययोजनांमुळे देशात थेट परकीय गुंतवणूकीचा ओघ  वाढला आहे. एप्रिल 2021 मध्ये भारताने 6.24 अब्ज अमेरिकन डॉलर्सची थेट परदेशी गुंतवणूक आकर्षित केली आणि ती एप्रिल 2020 च्या  (US$4.53 ) तुलनेत  38%  जास्त आहे.

एप्रिल 2021 मध्ये देशात  इक्विटीचा ओघ  4.44  अब्ज डॉलर्स इतका नोंदवला गेला होताजो एप्रिल 2020 च्या (US$ 2.77 अब्ज) तुलनेत 60 टक्क्यांनी वाढला आहे.

एप्रिल 2021 मध्ये एफडीआय इक्विटीच्या 24%  गुंतवणूकीसह मॉरिशस सर्वाधिक गुंतवणूक करणारा देश आहेत्याखालोखाल सिंगापूर (21%) आणि जपान (11%) आहे. एप्रिल 2021 मध्ये संगणक सॉफ्टवेअर व हार्डवेअर’ हे अव्वल क्षेत्र म्हणून उदयास आले असून एकूण एफडीआय इक्विटी प्रवाहात त्याचा वाटा  सुमारे 24% आहेत्याखालोखाल सेवा क्षेत्र (23%) आणि शिक्षण क्षेत्र (8%) आहे. एप्रिल 2021 मध्ये कर्नाटकमध्ये सर्वाधिक गुंतवणूक आली. जी एकूण एफडीआय इक्विटीच्या  31% आहेत्याखालोखाल महाराष्ट्र (19 %) आणि दिल्ली (15 टक्के ) आहे. भारताच्या थेट परकीय गुंतवणूकीमधील हा बदल जागतिक गुंतवणूकदारांमध्ये पसंतीचे गुंतवणूक केंद्र म्हणून  भारताच्या दर्जाला मिळालेली मान्यता आहे.