सव्वादोन कोटींपेक्षा अधिक नागरिकांची दुसरी लस शिल्लक

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

सव्वादोन कोटींपेक्षा अधिक नागरिकांची दुसरी लस शिल्लक

जालना: केंद्र सरकारकडून आवश्यकतेएवढ्या करोना प्रतिबंधक लशींचा पुरवठा होत नसल्याने राज्य सरकारपुढे अडचण निर्माण झाली आहे. शुक्रवारपर्यंत राज्यात चार कोटी ६३ लाखांपेक्षा अधिक लशींच्या मात्रा देण्यात आल्या. यापैकी तीन कोटी ४५ लाख ३० हजारांपेक्षा अधिक जणांना पहिली मात्रा दिली आहे. तर जवळपास एक कोटी १८ लाख ४६ हजार जणांना दोन्हीही डोस दिलेले आहेत. पहिली मात्रा घेतलेल्यांपैकी ३४ टक्के नागरिकांचे दुसरे लसीकरण आतापर्यंत झालेले आहे. तर दोन कोटी २६ लाखांपेक्षा अधिक (६६ टक्के) व्यक्तींचे अद्याप दुसरे लसीकरण व्हायचे असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

ते म्हणाले की, राज्यास आवश्यकतेएवढी लशीची मात्रा केंद्राकडून उपलब्ध होत नाही. दररोज १० ते १५ लाखांच्या दरम्यान लसीकरण करण्याची राज्याच्या आरोग्य विभागाची क्षमता आहे. परंतु तेवढा पुरवठा होत नसल्याने लसीकरण कमी होत आहे. गेल्या ऑगस्ट रोजी राज्यात जवळपास सव्वादोन लाख, ऑगस्ट रोजी पाच लाख १७ हजार आणि ऑगस्ट रोजी तीन लाख ४५ हजार लशींच्या मात्रा राज्यात देण्यात आल्या.

गेल्या शुक्रवारपर्यंत राज्यात जवळपास चार कोटी ६४ लाख पहिल्या आणि दुसऱ्या मात्रा देण्यात आल्या. गरजेएवढ्या लशींच्या मात्रा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सोबत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना भेटू, असे आपण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. शुक्रवारपर्यंत राज्यात पहिली मात्रा घेतलेल्यांपैकी जवळपास तीन लाख ६० हजार हेल्थ केअर वर्कर्सची लशीची दुसरी मात्रा घेणे बाकी होती. पहिली मात्रा घेतलेल्या २१ लाख २६ हजार ५७७ फ्रंटलाइन वर्कर्सपैकी लाख हजार ८२७ दुसरी मात्रा अद्याप देणे बाकी असल्याचेही त्यांनी सांगितले.