“बदकासारखी काय चालतेस?”, मलायका अरोरा पुन्हा झाली ट्रोल

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

“बदकासारखी काय चालतेस?”, मलायका अरोरा पुन्हा झाली ट्रोल

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा सिनेसृष्टिपासून लांब असली तरी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. ती अभिनयापेक्षा तिच्या बोल्ड फोटोमुळे सतत चर्चेत असते. बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिप असो किंवा तिने परिधान केलेले ड्रेस, तिला वेगवेगळ्या कारणांसाठी अनेकदा ट्रोल करण्यात आले आहे. यावेळेस मलायकाला तिच्या चालण्याच्या पद्धतीवरुन ट्रोल करण्यात आले आहे.

मलायका अरोराला ही बी-टाऊनमधील सर्वात फिट अभिनेत्रीपैकी एक आहे. तिला अनेकदा जीमला जाताना स्पॉट करण्यात आले आहे. नुकतंच तिला तिच्या मुंबईतील एका जीमबाहेर स्पॉट केले होते, यावेळीस तिच्या विचित्र बदका सारख्याचालीसाठी नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. मलायकाचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर बॉलिवूड पॅपने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत काळ्या रंगाचा ड्रेस परिधान करुन मलायका योगा सुडिओत जाताना दिसत आहे.