अभिनेता भूषण कडूच्या पत्नीचे कोरोनामुळे निधन

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

अभिनेता भूषण कडूच्या पत्नीचे कोरोनामुळे निधन

मुंबई, : मराठी अभिनेता भूषण कडू याची पत्नी कादंबरी कडू यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. ३९ वर्षीय कादंबरी यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर ठाण्यातील रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, प्रकृती खालावल्यामुळे त्यांना मुंबईतील केईएममध्ये हलवण्यात आले होतेउपचारादरम्यान कादंबरी कडू यांची प्राणज्योत मालवली. भूषण कडूला सात वर्षांचा मुलगा आहे.

कलर्स मराठी वाहिनीवरील बिग बॉस मराठी या रिअॅलिटीच्या पहिल्या सिजनमध्येही भूषणने हजेरी लावली होती. फॅमिली स्पेशल एपिसोडच्या निमित्ताने भूषणसोबत त्याची पत्नी कादंबरी मुलगा प्रकीर्त हे देखील बिग बॉसच्या घरात दिसले होतेकादंबरी यांच्या निधनामुळे कडू कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.