बळजबरीने धर्मांतर केल्यास लागणार रासुका, संपत्तीही जप्त होणार; मुख्यमंत्र्यांचे आदेश

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

बळजबरीने धर्मांतर केल्यास लागणार रासुका, संपत्तीही जप्त होणार; मुख्यमंत्र्यांचे आदेश

उत्तर प्रदेशमध्ये बळजबरीने धर्मांतर केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर योगी सरकार अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, धर्मांतर प्रकरणात दोषी आढळल्यास रासुका(राष्ट्रीय सुरक्षा कायदा)लावून संपत्ती जप्त करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

सोमवारी लखनऊमधून दोन मौलाना ताब्यात

उत्तर प्रदेश अँटी टेरेरिस्ट स्क्वॉड (ATS) ने सोमवारी दोन मौलाना जहांगीर आणि उमर गौतमला लखनऊमधील एका मोठ्या मुस्लिम संस्थेतून ताब्यात घेतले होते. त्यांच्यावर बळजबरीने हिंदूंचे धर्मांतर केल्याचा आरोप आहे. एटीएसची टीम सुमारे चार दिवस त्यांची चौकशी करून पुरावे गोळा करत होती. पाकिस्तानची गुप्तचर संघटना ISI त्यांना फंडिंग करत होती. ATS अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, हे दोघे गरीब हिंदूंना आपल्या जाळ्यात ओढत होते. त्यांनी आतापर्यंत एक हजार लोकांचे धर्मांतर केले आहे. यात प्रामुख्याने मुक-बधीर लोक सामील आहेत.

दोघेही दावा नावाने इस्लामिक सेंटर चालवायचे
दोन्ही मौलाना दावा इस्लामिक सेंटर नावाची संस्था चालवतात. 3 जून रोजी दिल्लीच्या दासना मंदिरात दोन मुस्लिम मुलांनी पुजारीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्या दोघांनाही पकडल्यानंतर मौलाना उमर आणि जहांगीर यांच्याविषयी माहिती मिळाली.

कानपूर, वाराणसी आणि नोएडा येथे धर्म परिवर्तन केले आहे.
या मौलानांनी नोएडा डेफ सोसायटीतील मूक-बधिर शाळेतील विद्यार्थ्यांना आमिष दाखवून आणि प्रलोभन देऊन धर्म परिवर्तन करून घेतले आहे. धर्मांतर झालेल्या झालेल्या एक हजार महिला आणि मुलांची यादी प्राप्त झाली आहे. कानपूर, वाराणसी आणि नोएडा येथील अनेक मुले स्त्रिया यांचेही धर्मांतर झाले आहे. कानपूरमधील मुलाला दक्षिणेकडील शहरात नेण्यात आले आहे. एसटीएफ त्याचा शोध घेत आहे.