इन्स्टाग्रामने कंगना रणौतची पोस्ट केली डिलीट

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

इन्स्टाग्रामने कंगना रणौतची पोस्ट केली डिलीट

बॉलिवूडची पंगा गर्ल अभिनेत्री कंगणा रणौत ही वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखली जाते. खळबळजनक वक्तव्य करून कायम वाद ओढावून घेणाऱ्या कंगनावर नुकतीच ट्विटरने कारवाई केलीय. कंगनाचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आलंय. त्यानंतर कंगनाने इन्स्टाग्रामवरून बेधडक वक्तव्य करण्यास सुरूवात केलीय. मात्र आता इन्स्टाग्राम देखील कंगनाचं एक ट्विट डिलीट केलंय. त्यामुळे इन्स्टाग्रामवरूही कंगनाचा पत्ता कट होणार का? अशी चर्चा रंगू लागली आहे. कंगनाने नुकतीच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत तिला करोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती. मात्र इन्स्टाग्रामने कंगनाची ही पोस्ट परस्पर डिलीट केली आहे. इन्स्टाग्रामने हे पाऊल उचलल्यानंतर कंगनाने इन्स्टाग्रामवरूनच संताप व्यक्त केलाय.

कंगनाने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केलीय. यात ती म्हणाली, “इन्स्टाग्रामने माझी पोस्ट डिलीट केली आहे, ज्यात मी करोनाला संपवून टाकेन अशी धमकी दिली होती. कुणाच्या तरी भावना दुखावल्या. म्हणजे दहशतवादी आणि कम्युनिस्टांबद्दल सहानभूती बाळगणारे ट्विटरवर पाहिले होते, मात्र कोव्हिड फॅन क्लब. कमाल आहे. इन्स्टावर दोन दिवस झाले आहेत. मात्र वाटत नाही एका आठवड्यापेक्षा जास्त टिकू शकते.अशी पोस्ट शेअर करत कंगनाने इन्स्टाग्रामवरच निशाणा साधला आहे.