ऑलिम्पिक स्पध्रेबाबतची अनिश्चितता संपवा फेडरर

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

ऑलिम्पिक स्पध्रेबाबतची अनिश्चितता संपवा फेडरर

ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याबाबत मी द्विधा मन:स्थितीत असून या प्रतिष्ठेच्या स्पर्धेच्या आयोजनाबाबतची अनिश्चितता संपवा, अशी सूचना २० वेळा ग्रँडस्लॅम जेतेपदे पटकावणारा महान टेनिसपटू रॉजर फेडररने व्यक्त केली आहे.

‘‘ऑलिम्पिकचे पुढे काय होईल, हे कुणालाच माहीत नाही. ऑलिम्पिकमध्ये खेळून स्वित्र्झलडला पदक जिंकून द्यायला मला आवडेल. सद्यपरिस्थितीमुळे ऑलिम्पिक स्पर्धा होणार नसेल तर तो निर्णय सर्वात आधी खेळाडूंना समजायला हवा. ऑलिम्पिक स्पर्धा होईल किंवा नाही, याची उत्सुकता सर्व खेळाडूंना लागून राहिली आहे. ऑलिम्पिकच्या आयोजनावरून जपानमध्ये प्रतिकार होत असेल तर या स्पर्धेसाठी जाणेच चांगले. पण पुढे काय होईल, याची मला कल्पना नाही. मी सध्या द्विधा मनस्थितीत आहे,’’ असेही फेडररने सांगितले.