बिग बॉस मल्याळमचे शूटिंग थांबले

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

बिग बॉस मल्याळमचे शूटिंग थांबले

तामिळनाडूमध्ये सुरू असलेल्या बिग बॉस मल्याळम सीझन 3 चे शूटिंग थांबवण्यात आले आहे. कोरोनाचा वाढता
संसर्ग लक्षात घेता तामिळनाडूमध्ये लॉकडाउन करण्यात आले आहे. त्यामुळे तेथे टीव्ही व चित्रपटांचे शुटिंग
थांबवण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले होते, परंतु असे असूनही बिग बॉसच्या निर्मात्यांनी या शोचे शूटिंग
सुरू ठेवले. अलीकडेच या शोच्या 6 क्रू मेंबर्सना कोरोनाचा संसर्ग झाला होता. सुपरस्टार मोहनलाल हे बिग बॉस हा
शो होस्ट करीत आहेत.
बुधवारी सेट सील करण्यात आला
या शोचे चित्रीकरण ईव्हीपी फिल्म सिटी येथे सुरू होते. बुधवारी रात्री 8 वाजता प्रशासनाकडून सेट सील करण्यात
आला आहे. त्यानंतर चॅनेलने एक निवेदन जारी केले की, कोरोनाची वाढती प्रकरणे आणि लॉकडाउनमुळे या
कार्यक्रमाचे शूटिंग तात्पुरते थांबविण्यात आले आहे. लॉकडाउन संपल्यानंतर लवकर शूटिंग सुरू होईल.

शोच्या निर्मात्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अंतर्गत सरकारी निर्देशांचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हा
दाखल करण्यात आला आहे. एफईएफएसआय युनियनचे अध्यक्ष आरके सेल्वमणी यांनी याआधीच सर्व प्रकारचे
चित्रीकरण थांबवण्यात यावे, असे एक निवेदन जारी करुन म्हटले होते. मात्र त्यानंतरही या शोचे चित्रीकरण सुरु
होते.
निर्माते 5 दिवसांची परवानगी मागत होते
बिग बॉस या शोवर कारवाई करणारे अधिकारी प्रीथी पारकवी यांनी सांगितले की, ते शोच्या सेटच्या आत गेले
असता सर्व स्पर्धक काचेच्या दाराच्या आत दिसले आणि त्यांना जेवण दिले जात होते. सेटवर 7 स्पर्धक आणि क्रू
मेंबर्स होते. निर्मात्यांनी त्यांना आणखी 5 दिवस चित्रीकरणाची परवानगी मागितली, जेणेकरुन त्यांना शोच्या 100
व्या दिवसांचे चित्रीकरण पूर्ण करता यावे. पण त्यांना परवानगी नाकारण्यात आली. सेटवर सील करण्यात आला
आणि निर्मात्यांना एक लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.