मुंबईत दिवसभरात 3,908 रुग्ण, 90 मृत्यू

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

मुंबईत दिवसभरात 3,908 रुग्ण, 90 मृत्यू

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील नव्या रुग्णांची प्रतिदिन संख्या कमी होऊ लागली असून रुग्ण करोनामुक्त होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. ही बाब मुंबईकरांसाठी दिलासादायक ठरू लागली आहे. मात्र मृत्युचे प्रमाण वाढल्यामुळे अधिकारी चिंतीत आहेत. शनिवारी 3,908 मुंबईकरांना करोनाची बाधा झाली असून 90 रुग्णांचा मृत्यू झाला.

फेब्रुवारीपासून मुंबईतील करोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढू लागली होती. एप्रिलमध्ये ती 11 हजारांवर पोहोचली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा रुग्णसंख्या कमी होऊ लागली आहे. शनिवारी 3,907 जणांना शनिवारी करोनाची बाधा झाल्यानंतर मुंबईतील एकूण रुग्णसंख्या सहा लाख 52 हजार 532 वर पोहोचली आहे. विविध रुग्णांमध्ये उपचार घेणारे 57 57 पुरुष आणि 33 महिलांचा शनिवारी मृत्यू झाला. त्यापैकी 53 जणांना दीर्घकालीन आजार होते. आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 13 हजार 251 वर पोहोचली आहे.

विविध रुग्णालयांमध्ये  5,900 रुग्ण शनिवारी करोनामुक्त झालेआतापर्यंत पाच लाख 78 हजार 331 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. विविध रुग्णालयांमध्ये 59 हजार 318 करोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत.

ठाणे जिल्ह्यात आणखी 2, 869 बाधित

ठाणे : ठाणे जिल्ह्यात शनिवारी 2 हजार 869 नवे करोना रुग्ण आढळून आले. तर, 53 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. गेल्या आठवड्याभराच्या रुग्णसंख्येतील ही सर्वाधिक घसरण आहे. दिवसभरात कल्याण डोंबिवलीत ८२२, ठाण्यात ७३२, नवी मुंबई ३८१, मिरा भाईंदर ३५९, ठाणे ग्रामीण १६३, बदलापूर १४८, अंबरनाथ १३२, उल्हासनगर ११० आणि भिवंडीत २२ रुग्ण आढळून आले. तर, ५३ मृतांपैकी कल्याण डोंबिवलीत ११, मिरा भाईंदर १०, ठाणे नऊ, नवी मुंबई आठ, अंबरनाथ पाच, उल्हासनगर चार, बदलापूर दोन, ठाणे ग्रामीण दोन आणि भिवंडीत दोन रुग्ण आढळून आले.