मुंबईत निर्बंध; मात्र, सोमवारपासून २१ जिल्हे निर्बंध मुक्तीच्या दिशेने

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

मुंबईत निर्बंध; मात्र, सोमवारपासून २१ जिल्हे निर्बंध मुक्तीच्या दिशेने

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यात हाहाकार माजल्याने राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केला. मात्र,
रुग्णसंख्येत घट झाल्याने 'ब्रेक द चेन' अंतर्गत लावण्यात आलेले निर्बंध हळूहळू हटविण्यात येत आहेत. पहिल्या
टप्प्यात 12 जिल्ह्यांमधील निर्बंध रद्द झाले होते. मात्र, आता ठाणे आणि पुण्यासह 21 जिल्ह्यांमधील निर्बंध
सोमवारपासून शिथिल होणार आहेत. निर्बंध किती ठेवायचे याचा निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकारी आणि
महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत. दरम्यान, सरकारने ठरवून दिलेल्या पाच स्तरांनुसार यामध्ये दर
आठवड्याला स्थानिक पातळीवर आढावा घेऊन या निर्बंधात बदल होणार आहेत.
मुंबईत गर्दी टाळण्यासाठी सध्याचेच निर्बंध कायम राहणार असून मुंबई महापालिकेने जोखीम टाळण्यासाठी हा
निर्णय घेतला आहे. मॉल्स, चित्रपटगृहे, नाट्यगृहे बंदच राहणार आहेत. तर, दुकाने खुली ठेवण्याची वेळ दुपारी 4
वाजेपर्यंतच राहणार आहे. याशिवाय सर्वसामान्यांच्या लोकल प्रवासावरील बंदीही कायम असणार आहे.
'या' सहा जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम
राज्यातले 21 जिल्हे सोमवारपासून निर्बंधमुक्त होत आहेत. मात्र, रुग्णसंख्या अधिक असलेल्या रायगड,
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, कोल्हापूर या सहा जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम राहणार आहेत.
तर अहमदनगर, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, नागपूर,
नांदेड, नंदुरबार, परभणी, सोलापूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ मध्ये जनजीवन सुरळीत सुरू होईल.