१५ जूनपर्यंत केंद्र पुरवणार ७ कोटी ८६ लाख लसी

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

१५ जूनपर्यंत केंद्र पुरवणार ७ कोटी ८६ लाख लसी

१५ जूनपर्यंत केंद्र पुरवणार ७ कोटी ८६ लाख लसी
नवी दिल्ली, : करोनाच्या दुसऱ्या लाटेत देशातील स्थिती चिंताजनक झाली आहे. आरोग्य यंत्रणेचे
तीनतेरा वाजले असून मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे गेल्या काही
दिवसांपासून करोना लसीकरणाची मागणी जोर धरू लागली आहे. १ मे पासून १८ वर्षांवरील
सर्वांचं लसीकरण करण्याचं केंद्र सरकारने जाहीर केलं आहे. मात्र करोना लशींचा तुटवडा
असल्याने या मोहिमेला धक्का बसला आहे. अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र बंद आहेत. त्यामुळे
विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं आहे. आता केंद्र सरकार राज्य सरकारला १५ जूनपर्यंत ७
कोटी ८६ लाख लस पुरवणार आहे. या लशी राज्य सरकारला मोफत पुरवल्या जाणार आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लसीकरण वाटपाची माहिती राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना पत्र

लिहून दिली आहे. यामध्ये कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लशींची माहिती आहे.
आगाऊ माहितीमुळे राज्य सरकारांना योग्य पद्धतीने नियोजन करता येणार आहे.
केंद्राने जाहीर केलेल्या धोरणानुसार प्रत्येक महिन्यात ५० टक्के लशी केंद्र सरकारकडून खरेदी
केल्या जातात. या लशी राज्यांना विनामुल्य पुरवल्या जातात. उर्वरित ५० टक्के लशी राज्य
सरकार आणि खासगी रुग्णालयांना खरेदी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या
धोरणानुसार केंद्र सरकारने राज्य सरकार आणि खासगी रुग्णालयांना आगाऊ माहिती दिली
आहे. १ मे ते १५ जूनपर्यंत पुरवण्यात येणारे ५ कोटी ८६ लाख २९ हजार लशींचे डोस राज्यांना
मोफत देणार आहे. या व्यतिरिक्त जून अखेर राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांकडून थेट
खरेदीसाठी एकूण ४ कोटी ८७ लाख ५५ हजार लशी उपलब्ध असतील अशी माहिती लस
उत्पादकांकडून देण्यात आली आहे. लसीकरण मोहिमेची यशस्वी अमलबजावणी करण्यासाठी
केंद्र सरकारने काही मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत.
केंद्र सरकारची मार्गदर्शक तत्त्वे
 जिल्हावार कोविड लसीकरण केंद्राची स्थापना करण्याच्या सूचना
 लसीकरणाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी माध्यमांचा प्रभावी वापर करणे
 राज्य सरकार आणि खासगी रुग्णालयांनी करोना लसीकरणाची आगाऊ माहिती कोविन डिजिटल
प्लॅटफॉर्मवर देणे
 राज्य आणि खासगी रुग्णालयांनी प्रत्येक दिवशी केलेल्या लसीकरणाची आकडेवारी देणे
 लसीकरण केंद्रावरील गर्दी टाळण्यासाठी नियम पाळावे
 कोविन डिजिटल प्लॅटफॉर्मवर लस नोंदणी करताना येणाऱ्या अडचणी दूर कराव्यात
देशात मागील २४ तासांत २ लाख ६७ हजार ३३४ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.
दिलासा देणारी बाब म्हणजे याच कालावधीत देशात ३ लाख ८९ हजार ८५१ रुग्ण करोनावर मात
करून घरी परतले आहेत. असं असलं तरी वाढत्या मृत्यूमुळे देशाची चिंता वाढली आहे. गेल्या २४
तासांत आतापर्यंतची उच्चांकी मृत्यूंची नोंद झाली आहे. देशात मंगळवारी ४ हजार ५२९ रुग्णांचा
मृत्यू झाला असून, एकूण मृतांचा आकडा २ लाख ८३ हजार २४८ वर जाऊन पोहोचला आहे.