हिमाचल पूरावर उपराष्ट्रपती नायडूंनी व्यक्त केले दु:ख

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

हिमाचल पूरावर उपराष्ट्रपती नायडूंनी व्यक्त केले दु:ख

नवी दिल्ली, : जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत पुरामुळे हिमाचल प्रदेशच्या लाहौल आणि स्पिटी भागात निर्माण झालेल्या परिस्थिती तसेच जीवित हानीवर उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडूंनी तीव्र शोक व्यक्त केला.
ट्वीटर द्वारे उपराष्ट्रपती म्हणाले, " पुरामुळे हिमाचल प्रदेशच्या लाहौल आणि स्पिटी भागात झालेल्या जीवित हानीने वेदना झाल्या. बाधित परिवारांना संवेदना तसेच हरवलेल्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना. "