माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील संस्थांना देणार ‘राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान पुरस्कार’ – सतेज पाटील

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील संस्थांना देणार ‘राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान पुरस्कार’ – सतेज पाटील

राज्याची माहिती तंत्रज्ञाच्या विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्थांना राज्य शासनाच्या वतीने राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती,माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री सतेज पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आयटी इंजिनियरींग सर्व्हिस सॉफ्टवेअर, आयटी एनेबल्ड सर्व्हिस (बीपीओ/केपीओ), आयटी इंफ्रास्ट्रक्चर (डेटा सेंटर), मोस्ट प्रॉमिसींग स्टार्टअप स्पेशल अवार्ड फॉर कॉन्ट्रीब्युशन टु महाराष्ट्र अशा ५ विभागात या पुरस्कारांची निवड होणार असल्याचे माहिती पाटील यांनी सांगितले. पुरस्कार मानचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

क्षेत्रातील उपक्रमशीलता वाढवणे,उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या माहिती तंत्रज्ञान समुहांना सन्मानित करून समाजात त्यांची ओळख निर्माण करणे,समाजात माहिती तंत्रज्ञानाचा गतिमान वापर होण्यासाठी प्रोत्साहन देणे,माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन अधिकाधिक रोजगार निर्मिती करण्यावर भर देणे,माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून पर्यावरणाचे जतन व संवर्धन करणे यासाठी हा पुरस्कार दिला जाणार आहे.

पुरस्कारांचे वेळापत्रक याप्रमाणे- २० ऑगस्ट, २०२१ रोजी नामांकनासाठी अर्ज दाखल करण्याचे प्रकटन,१५ सप्टेंबर – नामांकन दाखल करण्याची अंतिम तारीख,२० ऑक्टोबर- छाननी समितीची अंतिम बैठक. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुरस्कारांची घोषणा व पारितोषिक वितरण समारंभ.