हैतीमध्ये भूकंपाचे धक्के; आतापर्यंत ३०४ जणांचा मृत्यू

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

हैतीमध्ये भूकंपाचे धक्के; आतापर्यंत ३०४ जणांचा मृत्यू

वॉशिंग्टन, : अमेरिकेजवळील अटलांटिक महासागरातील देश असलेल्या हैती शहरात शनिवारी ७.२ तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. यामुळे आतापर्यंत ३०४ जणांचा मृत्यू झाला आहे तर १८०० हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत.
जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भूकंपामुळे हैती शहराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या भूकंपाचे केंद्रबिंदू हे उत्तर पूर्वमध्ये 12 किलोमीटर दूर संत लुइस दु सुडमध्ये आहे. भूकंपात अनेक घरे जमीनदोस्त झाली आहेत.अमेरिकेकडून भूकंपग्रस्त भागात तातडीने मदत पूरवली जात आहे. येथे एका महिन्यासाठी आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान हैतीमध्ये २०१८ साली ही ५.९ तीव्रतेचा भूकंप झाला होता. त्यात १२ हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. तर २०१० मध्ये झालेल्या भूकंपात तीन लाख लोकांचा मृत्यू झाला होता.