सामाजिक न्यायाच्या तत्त्वाला भाजपचा पहिल्यापासूनच विरोध - अखिलेश

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

सामाजिक न्यायाच्या तत्त्वाला भाजपचा पहिल्यापासूनच विरोध - अखिलेश

लखनौ - सामाजिक न्यायाच्या तत्त्वाला भाजपचा पहिल्यापासूनच विरोध आहे, असा आरोप समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, देशात जातनिहाय जनगणना ते करू देत नाहीत.

या मागे त्यांची मागासांना वर येऊ न देण्याचीच भूमिका आहे, असे त्यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र सादर करून जातनिहाय जनगणना करण्यास सरकारची तयारी नाही, असे स्पष्ट कळवले आहे.

अनेक मागास व अन्य मागास जातींची ही मागणी आहे, पण या जातींना त्यांच्या लोकसंख्येच्या आधारे लाभ मिळू नये असाच भाजपचा एकूण रोख आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. भाजप हा केवळ सत्ता आणि पैसा यांच्या मागे लागलेला पक्ष आहे सामाजिक न्यायाच्या तत्त्वाशी त्यांना काही देणेघेणे नाही, असा आरोपही त्यांनी केला.