सिंधुदुर्गात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत; अनेक ठिकाणी पूरस्थिती

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

सिंधुदुर्गात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत; अनेक ठिकाणी पूरस्थिती

सिंधुदुर्ग, : गेले दोन-तीन दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदी-ओहोळ दुथडी भरून वाहत आहेत. ठिकठिकाणचे रस्ते, पूल पाण्याखाली गेल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे. काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडून मालमत्तेचे नुकसान झाले आहे.  कुडाळ तालुक्यात माणगाव खोऱ्यात निर्मला नदीला पूर आल्याने आंबेरी पूल आणि मार्गावरचे कॉजवे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे २७ गावांचा संपर्क तुटला आहे..त्यामुळे परिसरातील अनेकांची मोठी गैरसोय झाली आहे. कोल्हापूरला जोडणाऱ्या करूळ आणि भुईबावडा घाटातली वाहतूक बंद आहे. आंबोली आणि फोंडाघाट मार्गे कोल्हापूर वाहतूक सुरु आहे अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिली आहे. कणकवली तालुक्यात खारेपाटण येथे सुख नदीला पूर आल्याने पुराचे पाणी खारेपाटण बाजारपेठेत घुसले आहे. संततधार पावसामुळे भात शेती सुद्धा पाण्याखाली गेली आहे. दरम्यान पावसाचा जोर कायम राहिल्यास शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. सावंतवाडी तालुक्यात शिरशिंगे येथे पुलावर पाणी आले आहे. शिरशींगे गावात जाणारी वाहतूक बंद असल्याची माहिती सावंतवाडीच्या तहसीलदार सावंतवाडी यांनी दिली. आज,
कणकवली आचरा मार्गावर वरवडे फळसेवाडी येथे गुरुवारी सकाळच्या सत्रात पाणी आल्याने रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला आहे अशी माहिती कणकवली तहसीलदार रमेश पवार यांनी दिली. तालुक्यात वरवडे सेंट उर्सुला स्कूलच्या दरम्याने पुलावर पाणी आल्याने फणसवाडी वरवडे या सकल भागामध्ये पाणी घुसल्याने रस्ते वाहतूकीसाठी बंद झाले आहेत व काही गाड्याही तेथे थांबवण्यात आल्या आहेत. कणकवली तालुक्यात काही गावात पाणी आल्याने पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे प्रशासनाच्यावतीने आपत्ती व्यवस्थापन कक्ष सतर्क असून नागरिकांनी कणकवली तहसील कार्यालय कणकवली आपत्ती व्यवस्थापनाशी संपर्क साधण्याचे आवाहन कणकवली तहसीलदार रमेश पवार यांनी केले आहे.  कणकवलीत सततधार पडणाऱ्या पावसामुळे कणकवली शहरातील हर्णे आळी येथे संतोष ठाणेकर यांच्या घरावर सकाळच्या सत्रात झाड पडून मोठे नुकसान झाले आहे. कणकवली नागरपंचायत कर्मचारी याना याची माहीती मिळताच तातडीने घटनास्थळी दाखल होत पावसातच झाड बाजूला करण्याचें काम सुरू केले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही पण कौले फुटल्याने घराचे मोठे नुकसान झाले आहे. कणकवली तालुक्यात मुसळधार पडणार्या पावसाने खारेपाटण बाजारपेठेमध्ये पाणी घुसले आहे. काही ठिकाणचे रस्तेच जलमय झाल्याचे दिसत आहे.खारेपाटण मुख्य रस्ता ,बाजार जाणारा रस्ता बंद, खारेपाटण कालभैरव मंदिर रस्ता बंद, खारेपाटण चिंचवली रस्ता बंद, खारेपाटण बंदर गाव सम्यक नगर वाहतूक ठप्प, या सर्व ठिकाणचे रस्ते बंद झाल्यामुळे खारेपाटणचे जनजीवन विस्कळीत झाले आहे