राज कुंद्राच्या अडचणीत वाढ

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

राज कुंद्राच्या अडचणीत वाढ

मुंबईराज कुंद्रा आणि रियाब थोरपे हे व्हॉट् ऍप ग्रुप आणि चॅट डिलीट करून पुरावा नष्ट करण्याच्या प्रयत्नात होते. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून मुंबई क्राईम ब्रॅंचने 51 पाॅर्न फिल्म जप्त केल्या आहेत, अशी माहिती सरकारी वकीलांनी उच्च न्यायालयात दिली.

कुंद्रा आणि थोरपे यांनी त्यांना केलेल्या अटकेला आणि कोठडीत ठेवण्याच्या कारवाईला त्यांनी आव्हान दिले आहे. सात वर्षांची शिक्षा होऊ शकणाऱ्या गुन्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहितेप्रमाणे म्हणणे मांडण्यासाठी नोटीस बजावणे अपरिहार्य आहे. त्यामुळे ही कारवाई बेकायदा असल्याचे त्यांच्या वकीलांनी म्हटले आहे.

न्याअजय गडकरी यांच्या खंडपीठापुडे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे झालेल्या सुनावणीत पै यांनी युक्तीवाद केला की, या दोघांनी पोर्न चित्रपट बनवण्याचा घृणास्पद उद्योग केला आहे. त्यांचे फोन आणि अन्य डिव्हाईसमधून ते जप्त करण्यात आले आहेत. त्यांच्या हॉटशॉट ऍपमधून कुंद्रा यांनी त्यांचे लंडनमध्ये कंपनी असणारे मेव्हणे प्रदीप बक्षी यांना -मेल केल्याचे स्पष्ट केले आहे.