टोक्यो पॅरालिम्पिक : बॅडमिंटनपटू कृष्णा नागरला सुवर्ण पदक

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

टोक्यो पॅरालिम्पिक : बॅडमिंटनपटू कृष्णा नागरला सुवर्ण पदक

नवी दिल्ली : टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटू कृष्णा नागर याने सुवर्ण पदक जिंकले. कृष्णाने हाँगकाँगच्या चू मान काईवर मात करत सुवर्णपदक पटकावले. कृष्णाने बॅडमिंटनच्या पुरुष एकेरीच्या एसएच 6 फायनलमध्ये चू मान काई 21-17, 16-21, 21-17 असा पराभव केला.
कृष्णाच्या विजयासोबतच भारताच्या खात्यात ५ सुवर्णपदके जमा झाली आहेत. टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या पदकांची संख्या आता 19 पर्यंत पोहोचली आहे. यात 5 सुवर्णपदके, 8 रौप्य आणि 6 कांस्य पदकांचा समावेश झाला आहे.