संजय दत्तला यूएई सरकारकडून मिळाला गोल्डन व्हिसा

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

संजय दत्तला यूएई सरकारकडून मिळाला गोल्डन व्हिसा

अभिनेता संजय दत्तला संयुक्त अरब अमिरातीने घातलेल्या प्रवासी निर्बंधानुसार युएईचा गोल्डन व्हिसा मिळाला आहे. ही बातमी स्वतः संजय दत्तने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केली आहे. यासोबत त्याने एक फोटोदेखील शेअर केला आहे. यात दुबईचे जनरल डायरेक्टर ऑफ रेसीडन्सी अँड फॉरेन अफेअर्सचे डायरेक्टर जनरल मेजर जनरल मोहम्मद अहमद अल मर्री हे संजय दत्तला गोल्डन व्हिसा सोपवताना दिसत आहेत. यासह संजयने युएई सरकारचे आभार देखील मानले आहेत.

सोशल मीडियावर व्यक्त केला आनंद
संजय दत्तने फोटो शेअर करत लिहिले, 'जीडीआरएफए दुबईचे डायरेक्टर मेजर जनरल मोहम्मद अहमद अल मर्री यांच्या उपस्थितीत युएईचा गोल्डन व्हिसा स्विकारताना आनंद होतोय. हा सन्मान दिल्याबद्दल युएई सरकारचे खूप खूप आभारफ्याय दुबईचे सीओओ हमद ओबैदल्ला यांचे देखील आभार,' असे संजय म्हणाला आहे.