पवित्र रिश्ता २.०’च्या सेटवरील फोटो व्हायरल; चाहते म्हणाले “सुशांतची आठवण नक्की येईल”

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

पवित्र रिश्ता २.०’च्या सेटवरील फोटो व्हायरल; चाहते म्हणाले “सुशांतची आठवण नक्की येईल”

२००९ सालामध्ये छोट्या पडद्यावरची अतिशय लोकप्रिय ठरलेली मालिका म्हणजेपवित्र रिश्ता’. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केले आहे. लवकरचं या मालिकेचं दुसरे पर्व येत असून यात शाहीर शेख मानवच्या तर अंकिता लोखंडे पुन्हा एकदा अर्चनाच्या भूमिकेत झळकणार आहे. या मालिकेच्या पहिल्या पर्वात दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतने मानवची भूमिका गाजवली होती. सुशांतने ही मालिका सोडल्या नंतर हितेन तेजवानी मानवची भूमिका साकारताना दिसला होता.

ज्या मालिकेची वाट आपण आतुरतेने पहात होतो त्यापवित्र रिश्ता .चे चित्रीकरण सुरू झाले आहे.’पवित्र रिश्ता .मालिकेचे प्रक्षेपण ओटीटीवर होणार आहे. आणि आता अंकिता लोखंडे आणि शाहीर शेख स्टाररपवित्र रिश्ता .ची पहिली झलक देखील समोर आली आहे. या सिनेमाच्या सेटवरील फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

शाहीर आणि अंकिताच्या मालिकेचा पहिला लूक सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होताना दिसत आहे. ‘अल्ट बालाजीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर याची पहिली झलक शेअर केली आहे. या फोटोंमध्ये शाहीर आणि अंकिता लोखंडे सोबत ऊषा नाडकर्णी आणि रणदीप राय दिसत आहेत. त्यामुळे दुसऱ्या सिक्वलमध्ये देखील उषा नाडर्णींचा दमदार अभिनय पाहता येणार आहे.