शरद पवारांनी काँग्रेस पक्ष सोडला नाही, तर त्यांना काढलं होतं – रामदास आठवले

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

शरद पवारांनी काँग्रेस पक्ष सोडला नाही, तर त्यांना काढलं होतं – रामदास आठवले

शिवसेनेचे माजी खासदार अनंत गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. एकीकडे शिवसेनेने अनंत गीते यांच्या वक्तव्यापासून फारकत घेतली असून दुसरीकडे राष्ट्रवादीने त्यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. अडगळीतले नेते असा उल्लेख करत सुनील तटकरे यांनी अनंत गीते यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे, दरम्यान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीदेखील अनंत गीते यांचं वक्तव्य योग्य नसल्याचं म्हटलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

आनंद गीते यांचं वक्तव्य योग्य नाही. शरद पवार सन्माननीय नेते आहेत. कोणत्या पक्षाचे नेते नाहीत हे खरं आहे, मात्र ते महाराष्ट्राचे नेते आहेत. शरद पवार यांनी काँग्रेस पक्ष सोडला असं नाही, तर त्यांना काँग्रेसमधून बाहेर काढण्यात आलं. त्यामुळे शरद पवारांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला असं नाही,” असं रामदास आठवलेंनी म्हटलं आहे. शरद पवारांवर इतका गंभीर आरोप केला आहे तर शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहू नये. शिवसेनेने पुन्हा एकदा स्वगृही परतत भाजपा, आरपीआयसोबत मिळून बाळासाहेबांचं शिवशक्ती भिमशक्ती स्वप्न साकार केलं पाहिजे,” असा सल्ला रामदास आठवले यांनी दिला आहे.

पुढे ते म्हणाले की, “शिवसेनेला भवितव्य उज्वल करायचं असेल तर काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत राहणं त्यांचं नुकसान आहे. अडीच वर्षांचा जो फॉर्म्यूला आहे त्यावर एकमत करुन भाजपा-सेनेने एकत्र यावं आणि राज्याच्या विकासाला प्रगती द्यावी. केंद्राकडून जास्तीत जास्त निधी मिळवत मुंबई आणि राज्याचा विकास करावा. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतला पाहिजे. ऑक्टोबरच्या दसरा मेळाव्याआधी त्यांनी भाजपासोबत आलं पाहिजे”.तिन्ही पक्षांत धुसमूस सुरु असून सातत्याने एकमेकांवर आरोप केले जात आहेत. रोज एकमेकांवर गंभीर आरोप करणं आणि परत सत्तेत राहणं परवडणारं नाही. काँग्रेसने पाठिंबा काढावा किंवा शिवसेनेने मुख्य प्रवाहात म्हणजेच भाजपासोबत यावं. अडीच वर्ष उद्धव ठाकरे आणि अडीच वर्ष फडणवीस यांनी मुख्यंमंत्री राहावं. पुढच्या निवडणुका एकत्रित लढून महाराष्ट्राचं भलं करावं,” असंही यावेळी त्यांनी म्हटलं आहे.