रामदास आठवलेंनी राज्यसभेत सादर केलेल्या कवितेवरुन गोंधळ; विरोधकांना ‘तो’ शब्द खटकला

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

रामदास आठवलेंनी राज्यसभेत सादर केलेल्या कवितेवरुन गोंधळ; विरोधकांना ‘तो’ शब्द खटकला

संसदेचं वरीष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेमध्ये बुधवारी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या खासदारांमध्ये जोरदार वाद झाल्याचा प्रकार घडला. यावेळी विरोधकांनी आपल्या मर्यादेचं उल्लंघन केल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे, तर मार्शल्सकडून खासदारांवर, विशेषत: महिला खासदारांवर हल्ला झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. बुधवारी सायंकाळी हा प्रकार घडल्यानंतर दोन्ही सभागृहांचं कामकाज स्थगित करण्यात आलं आणि अधिवेशन संपलं. मात्र या गोंधळाच्या आधापासूनच राज्यसभेमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या खासदारांमध्ये बाचाबाची आणि गोंधळ झाल्याचं पहायला मिळालं. विशेष म्हणजे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांना राज्यसभेमध्ये बोलण्याची संधी देण्यात आली असता त्यांनी सादर केलेल्या कवितेमुळेही चांगलाच गदारोळ झाल्याचं पहायला मिळालं.

आठवलेंनी यमक जुळवून १२७ व्या घटनादुरुस्ती विधेयकावरील चर्चेदरम्यान एक कविता सादर केली. त्यावेळी पिठासीन डॉ. सस्मित पात्रा यांच्याकडे विरोधकांनी आक्षेप नोंदवत या कवितेमधील एक शब्द संसदीय नसल्याचा आरोप केला. त्यावर पात्रा यांनी मी तुमच्या मुद्याची दखल घेतली आहे असं सांगत आठवलेंना त्यांचं बोलणं पूर्ण करण्यास सांगितलं. मात्र आठवलेंनी कविता सादर करताना विरोधी खासदारांनी आराडाओरड सुरु ठेवला. तेव्हा पात्रा यांनी अससंदीय शब्द रेकॉर्डमध्ये घेतला जाणार नाही असं विरोधकांना सांगितलं. त्यानंतरही आठवले बोलताना विरोधक गोंधळ करत होते.