‘शितली’ एका नव्या भूमिकेत येणार प्रेक्षकांच्या भेटीला

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

‘शितली’ एका नव्या भूमिकेत येणार प्रेक्षकांच्या भेटीला

लागिरं झालं जी’ या मालिकेत शीतलची भूमिका साकारत महाराष्ट्रातील घराघरात पोहोचणारी अभिनेत्री म्हणजे शिवानी बावकर. मालिकेतला शीतलचा अंदाज रसिकांच्या चांगलाच पसंतीला पडला होता. या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी शिवानीचे शितली हे पात्र आजही प्रेक्षकांच्या चांगलेच लक्षात आहे. या मालिकेनंतर शिवानी कोणत्या मालिकेत दिसणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले होते.

सोनी मराठी वाहिनीवर ‘कुसुम’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री शिवानी बावकर या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सासर आणि माहेर अशा दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या मुलीच्या भूमिकेत शिवानी दिसणार आहे.

सोनी मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘कुसुम’ मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये शिवानीला लोकलमध्ये तिची मैत्रीण तिला संध्याकाळी मिसळ पार्टी करण्याबद्दल विचारते, तेव्हा ‘बाबांना दवाखान्यात घेऊन जायचं आहे’, असं सांगते. त्यावर ‘अजूनही तूच करतेस त्या घरचं?’ असं तिची मैत्रीण विचारते. त्यावर कुसुम तिला विचारते की, ‘सासर जोडायला माहेरची नाळ तोडायची गरज आहे का?’सर्वच मुलींच्या मनातला प्रश्न तिनी यात बोलून दाखवला आहे.