सर्व राजकारणी एकाच माळेचे मणी, छगन भुजबळांविरोधात हायकोर्टात जाणार : अंजली दमानिया

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

सर्व राजकारणी एकाच माळेचे मणी, छगन भुजबळांविरोधात हायकोर्टात जाणार : अंजली दमानिया

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला आहे.छगन भुजबळ यांना दिल्लीतील कथित महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात क्लीन चीट मिळाली आहे. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणाच्या आरोपातून छगन भुजबळ मुक्त झाले आहेत. या प्रकरणातून छगन भुजबळांचं नाव वगळण्यात आलं आहे.मुंबईतील सत्र न्यायालयाने आज हा सर्वात मोठा निर्णय दिला.छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात दोन वर्षांची जेलवारी झाली होती. भुजबळांची आरोपातून मुक्तता होताच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी टीकास्त्र सोडत छगन भुजबळांविरोधात हायकोर्टात जाणार असल्याचंही अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे. तसंच सर्व राजकारणी एकाच माळेचे मणी असल्याचंही अंजली यांनी म्हटलं आहे.

या प्रकरणात छगन भुजबळ यांच्याकडून आपलं नाव गुन्ह्यातून वगळावं अशी याचिका सत्र न्यायलयात दाखल करण्यात आली होती.भुजबळांच्या याचिकेवर मुंबई सत्र न्यायालयाने आज मोठा निर्णय देत, छगन भुजबळांना मुक्त केलं.या प्रकरणात यापूर्वी 5 जणांना दोषमुक्तता करण्यात आलं आहे.तेव्हा ACB ने बेजबाबदारपणे गुन्हा नोंदवल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.विकासक चमणकर कुटुंबियांतील चौघांसह एका पीडब्ल्यूडी अभियंत्याचा यामध्ये समावेश होता.मात्र आज छगन भुजबळांचं नावही या प्रकरणातून वगळण्यात आलं.