राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाज अस्वस्थ : देवेंद्र फडणवीस

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाज अस्वस्थ : देवेंद्र फडणवीस

नागपूर, : प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत  ओबीसी आरक्षणा संदर्भात  महाविकास आघाडी सरकार विरुद्ध आयोजित  भाजपच्या राज्यव्यापी विरोध प्रदर्शनात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते  देवेंद्र फडणवीसांनी  शनिवारी नागपुरात भाग घेतला.  यावेळी नागपूरचे  भाजप लोकप्रतिनिधी,  कार्यकर्तेपदाधिकारी तसेच नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी स्थानिक पोलिसांनी प्रदर्शनार्थ देवेंद्र फडणवीसांना अटक केली. 

याबाबत माहिती देताना तसेच  सामाजिक माध्यमांवर आपल्या भावना व्यक्त  देवेंद्र फडणवीस म्हणाले, "    

एकतर ओबीसी आरक्षण द्यानाहीतर खुर्च्या खाली करा!

ज्यांनी सर्व समाजांच्या उन्नतीसाठी आपले आयुष्य वेचलेत्या छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी ओबीसी आरक्षणासाठी आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण राज्यात निर्णायक लढ्याचा प्रारंभ झाला. कोरोनाच्या नियमांचे पालन करीत राज्याच्या कानाकोपर्‍यात आंदोलन करण्यात आले. मी स्वत: नागपूर येथे आंदोलनात सहभाग घेतला. माझ्या सहकार्‍यांसह अनेक कार्यकर्त्यांना यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतले. केवळ आणि केवळ राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाज आज अस्वस्थ आहे. राज्य सरकार म्हणून स्वत: काहीही न करणेन्यायालयात केवळ तारखा मागत राहणे आणि केंद्र सरकारवर टीका करण्यात धन्यता मानणार्‍यांनी मुद्दामच या आरक्षणाचा बळी दिला. राज्यातील मंत्री स्वत:च मोर्चे काढत राहिले. पण त्यांनी 15 महिने मागासवर्ग आयोग गठीत केला नाही. एम्पिरिकल डेटा हवा असताना तो तयार करण्याची तसदी घेतली नाही. म्हणूनच हे सारे ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचे मारेकरी आहेत.

भारतीय जनता पार्टी आपले हे आंदोलन यापुढेही असेच सुरू ठेवेल. ओबीसी समाजाचे आरक्षण जोवर पूर्ववत होत नाहीतोवर हा संघर्ष असाच रस्त्यावर दिसत राहील. सातत्याने खोटे बोलणार्‍यांचा बुरखा जनतेसमोर फाटलाच आहे. आता जनताही त्यांना उत्तर देईल. माझी खात्री आहे कीयोग्य प्रयत्न केले तर तीन ते चार महिन्यात आपण ओबीसी आरक्षण परत आणू शकतो. सूत्र आमच्या हाती द्या आणि हे ओबीसी आरक्षण परत नाही आणू शकलोतर राजकीय संन्यास घेईन! "