महाबळेश्वर, पाचगणी पर्यटकांसाठी खुले

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

महाबळेश्वर, पाचगणी पर्यटकांसाठी खुले

वाई : महाबळेश्वर, पाचगणी ही राज्याची पर्यटनस्थळे प्रदीर्घ टाळेबंदीनंतर  शनिवारपासून पर्यटकांसाठी खुली करण्यात येत आहेत. मात्र येथे येणाऱ्या पर्यटकांची करोनाची जलद चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती वाईच्या प्रांताधिकारी संगीता राजापूरकर-चौगुले यांनी दिली.

साताऱ्यातील घटत्या करोना संसर्गामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आज निर्बंधामध्ये मोठी शिथिलता आणल्याचे जाहीर केले आहे.   गेल्या दोन महिन्यांपासून महाबळेश्वर, पाचगणी ही  पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी बंद करण्यात आली होतीनिर्बंधांमुळे   बाजारपेठा, व्यवस्था बंद ठेवण्यात आल्या होत्या. येथे येणाऱ्या पर्यटकांची जलद प्रतिजन चाचणी करण्यात येऊन त्यात बाधित नसलेल्यांनाच प्रवेश देण्यात येणार असल्याचे राजापूरकर-चौगुले यांनी सांगितले.