नायब राज्यपाल मनोज सिन्हांनी घेतली संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

नायब राज्यपाल मनोज सिन्हांनी घेतली संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट

नवी दिल्ली : केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी रविवारी नवी दिल्लीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह  यांची  सदिच्छा भेट घेतली. यावेळी  राजनाथ सिंह आणि  मनोज सिन्हा  यांनी  जम्मू आणि काश्मीर तसेच  अन्य विषयांवर मुखकवच आणि सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करीत चर्चा केली. संरक्षण  मंत्री कार्यालयाने या संदर्भात ट्वीटर द्वारे ही माहिती दिली. 24 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि काश्मीरच्या राजकीय पक्षांची सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची समजल्या जात आहे.