माझ्या विचारांना जास्तीत-जास्त चालना देण्याचे अजित पवारांचे ‘मंत्री’ या नात्याने कर्तव्य – उदयनराजे

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

माझ्या विचारांना जास्तीत-जास्त चालना देण्याचे अजित पवारांचे ‘मंत्री’ या नात्याने कर्तव्य – उदयनराजे

जिल्ह्यात अजित पवारांनी जास्तीत-जास्त दौरे करावेत आणि माझ्या विचारांना जास्तीत-जास्त चालना देण्याचे काम ‘मंत्री’ या नात्याने त्यांनी करावे. आम्ही वेळोवळी सूचना देऊ, त्या त्यांनी आचरणात आणाव्यात, असे खासदार उदयनराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सातारा दौऱ्यावरून म्हटले आहे.

साताऱ्यातील निवासस्थानी त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी सातारा जिल्ह्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दौरे अलिकडच्या काळात वाढले आहेत. याविषयी विचारले असता, खासदार उदयनराजे म्हणाले, ”अजित पवारांचे दौरे होतात ही चांगली गोष्‍ट आहे. वास्तविक, हा विषय त्यांच्याशी निगडीत नाही. पण, ते माझ्या मताशी सहमत आहेत. ते सातारा जिल्ह्याचा नक्की विकास साधतील.”

तसेच, ”अजित पवारांनी जास्तीत-जास्त दौरे सातारा जिल्ह्यात करावेत. माझ्या विचारांना जास्तीत-जास्त चालना देण्याचे काम मंत्री या नात्याने करण्याचे त्यांचे कर्तव्य आहे. आम्ही वेळोवेळी त्यांना सूचना देत जाऊ, त्या सूचना आचरणात आणण्याचे काम तुमच्यासारख्या तज्ञ आणि अनुभवी लोकांनी केले पाहिजे. ते करतीलही. सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी ते झटत आहेत, ही चांगली बाब आहे.” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी सोमवारी सातारा जिल्ह्यात आहेत. रविवारी खटाव येथील कार्यक्रम झाल्यानंतर ते साताऱ्यात मुक्कामी आहेत. यावेळी साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व जेष्ठ कार्यकर्ते त्यांना भेटणार आहेत. सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या रणनीतीला अंतिम स्वरूप येऊ शकते. सकाळी साडेसात वाजता जिल्हा आढावा बैठक सोमवारी सकाळी ते वाई येथे पालिकेच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन अजित पवार यांच्या हस्ते आमदार मकरंद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. भिलार येथे ज्येष्ठ नेते बाळासाहेब भिलारे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट देणार आहेत. यानंतर माचुतर (ता. महाबळेश्वर ) येथे पर्जन्यवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत.