भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादव आज १४ सप्टेंबर रोजी आपला ३१वा वाढदिवस साजरा करत आहे.

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादव आज १४ सप्टेंबर रोजी आपला ३१वा वाढदिवस साजरा करत आहे.

तो नुकताच आयपीएलसाठी इंग्लंडहून यूएईत परतला आहे. रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराहसोबत यांच्यासोबत तोही सध्या आयसोलेशनमध्ये आहे. अशा परिस्थितीत, तो त्याचा वाढदिवस त्याच्या मुंबई इंडियन्सच्या सहकाऱ्यांसोबत साजरा करू शकणार नाही. १९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार आपल्या फलंदाजीची चुणूक दाखवेल. आंतरराष्ट्रीय पदार्पण केल्यापासून सूर्यकुमार यादव टीम इंडियाचा नियमित सदस्य बनला आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये एक दशकभर मेहनत केली आणि त्यानंतर त्याला भारतासाठी पदार्पण करण्याची संधी मिळाली. सूर्यकुमारने अखेर इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यामध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले, पण त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही. इशान किशनच्या दुखापतीने सूर्यकुमारसाठी संघाचे दरवाजे उघडले आणि जेव्हा त्याला फलंदाजीची संधी मिळाली, त्याने या सामन्यातसामनावीरपुरस्कार जिंकत ३१ चेंडूत ५७ धावा केल्या. सूर्यकुमारने पदार्पणात एक अविस्मरणीय विक्रम केला. टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात पहिल्या चेंडूवर षटकार मारणारा तो पहिला भारतीय फलंदाज बनला. त्याने इंग्लंडचा तेजतर्रार गोलंदाज जोफ्रा आर्चरला हा षटकार ठोकला होता. त्याने खेळलेला फटका पाहून आर्चरही चक्रावला होता.

सूर्यकुमार यादवने २०१८ मध्ये मुंबई इंडियन्समध्ये सामील होण्यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्ससोबत चार वर्षे घालवली. २०१८मध्ये, केकेआरने कर्णधार गौतम गंभीर आणि उपकर्णधार सूर्यकुमार यादव यांना रिलीज केले. सूर्यकुमार केकेआरसोबत चार हंगामात तीन वर्षे उपकर्णधार होता. २०१८च्या मेगा लिलावात केआरने सूर्यकुमार यादवला खरेदी करण्याचा प्रयत्न केला, पण मुंबई इंडियन्सने ३.२ कोटींची बोली लावून त्याला आपल्या संघात समाविष्ट केले.