वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या महामुकाबल्यासाठी इंग्लंडला जाणार दिनेश कार्तिक!

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या महामुकाबल्यासाठी इंग्लंडला जाणार दिनेश कार्तिक!

भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक बर्याच दिवसांपासून संघापासून दूर होता. २०१९च्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यापासून कार्तिक भारतीय संघात परतला नाही. त्यामुळे तो आता त्याच्या कारकिर्दीच्या अंतिम टप्प्यावर आला आहे. आयपीएलच्या १४व्या हंगामातही कार्तिकला मोठी कामगिरी करता आली नाही. असे असूनही तो आता पुढील महिन्यात होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी इंग्लंडला असेल.

कार्तिक खेळाडू म्हणून नव्हे तर एका नव्या भूमिकेसाठी या स्पर्धेला हजेरी लावणार आहे. कार्तिक आणि माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर या दोन भारतीयांना जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात समालोचाकाची भूमिका मिळाली आहे. त्यामुळे भारत-न्यूझीलंडच्या खेळाडूंव्यतिरिक्त कार्तिकलाही या सामन्यात चाहत्यांना पाहता येणार आहे. १८ जून ते २२ जून असा हा सामना साऊथम्प्टनच्या हॅम्पशायर बाउल येथे होईल. कार्तिकला भारतीय संघासाठी तिन्ही स्वरूपात खेळण्याची संधी मिळाली आहे. त्याने १७ कसोटीत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे, पण सध्या तो गेल्या वर्षांपासून संघाबाहेर आहे.