भारत सरकारचा मोठा निर्णय:ई-आणीबाणी X-Misc व्हिसा जाहीर, अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी हेल्पलाइन क्रमांक आणि ई-मेल आयडी जारी

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

भारत सरकारचा मोठा निर्णय:ई-आणीबाणी X-Misc व्हिसा जाहीर, अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी हेल्पलाइन क्रमांक आणि ई-मेल आयडी जारी

निर्णय घेतला आहे. व्हिसा प्रक्रियेत गती आणण्यासाठी भारतीय गृह मंत्रालयाने या परिस्थितीचा आढावा घेतला. तालिबान्यांनी अफगाणिस्तानचा ताबा मिळवताच देशात आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. लोक विमानात जेथे जागा मिळेल तेथे बसून प्रवास करत आहे.

दरम्यान, यामध्ये आतापर्यंत 5 लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर भारत सरकारने ई-आणीबाणी X-Misc व्हिसाची घोषणा केली आहे. यासोबतच अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांसाठी हेल्पलाइन क्रमांक आणि ई-मेल आयडी जारी केला आहे. या प्रक्रियेमुळे आता व्हिसा अर्जांचा जलदगतीने निपटारा होणार आहे.

हेल्पलाइन क्रमांक आणि ई-मेल आयडी जारी

अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांशी संपर्क साधण्यासाठी भारत सरकारने एक हेल्पलाईन क्रमांक आणि ई-मेल आयडी जारी केला आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने हेल्पलाईन क्रमांकांसोबत +919717785379 ई-मेल MEAHelpdeskIndia@gmail.com देखील जारी केला आहे. यामुळे अफगाणिस्तानमध्ये अडकलेले लोक भारतापर्यंत आपला संदेश पोहोचवू शकतात.

अफगाणिस्तानातील परिस्थिती जवळून पाहत आहे - एस जयशंकर

अफगाणिस्तानातील सध्याच्या परिस्थितीवर भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी टीप्पणी केली आहे. ते म्हणाले की, तालिबानच्या आगमनानंतर भारत अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर बारीक नजर ठेवून आहे. आम्ही काबूलमधील परिस्थितीवर सतत नजर ठेवून असून भारतात परत येऊ इच्छिणाऱ्यांची आम्हाला चिंता आहे. परंतु, सध्या विमानतळाचे कामकाज हे मुख्य आव्हान आहे. आम्ही या संदर्भात सतत बोलणी करत असल्याचे जयशंकर यांनी सोशल मीडियावरुन सांगितले.