पाक कर्णधार बाबर आझमची ‘बाबर की कहाणी’ होतेय जोरदार व्हायरल!

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

पाक कर्णधार बाबर आझमची ‘बाबर की कहाणी’ होतेय जोरदार व्हायरल!

पाकिस्तान क्रिकेटमध्ये बाबर आझम या नावाला फार वलय प्राप्त झाले आहे. क्रिकेटमधील त्याने केलेली प्रगती पाहता तो अनेकांसाठी आदर्श ठरला आहे. २६ वर्षीय बाबरने २०१५मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि लवकरच तो सर्वांचा लाडका बनला. २०१९मध्ये बाबरला पाकिस्तानच्या टी-२० संघाचा कर्णधार बनविण्यात आले होते. एका वर्षानंतर, पाकिस्तानचा तिन्ही फॉर्मेटमध्ये कर्णधार झाला. बाबरचा हा प्रवास पुढच्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे. लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर बॉल बॉय म्हणून क्रिकेटला सुरुवात करणार्या बाबरने आपले कौशल्य पणाला लावत मेहनतीने हे साम्राज्य उभे केले.

आता बाबर आपली ही कहाणी लोकांपुढे आणणार आहे. बॉल बॉय ते पाकिस्तानचा कर्णधार हा प्रवास तोबाबर की कहाणीयाद्वारे सांगणार आहे. बाबरने आपल्या ट्विटरवरबाबर की कहाणीचे एक पोस्टर शेअर केले आहे, ही कहाणी उद्या लाँच होणार आहे.

बाबर की कहानीव्हायरल!

बाबरचे हे ट्वीट अल्पावधीतच हजारो लोकांनी रिट्वीट केले. एका ट्विटर युजरने लिहिले की बाबर, तू चांगला आहेस. परंतु अद्याप अजून बराच पल्ला गाठायचा आहे. बाबरची ही कहाणी वर्ल्डकप विजयासह संपली पाहिजे, अले काहींनी म्हटले आहे. ‘बाबर की कहानीहे पुस्तक, बायोपिक किंवा माहितीपट किंवा अजून काय आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.