राज्यपालांकडून महाविकासआघाडीच्या अधिकारात वारंवार हस्तक्षेप – नवाब मलिक

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

राज्यपालांकडून महाविकासआघाडीच्या अधिकारात वारंवार हस्तक्षेप – नवाब मलिक

मुंबई : महाराष्ट्रात महाविकासआघाडीचं सरकार आल्यानंतर, महाराष्ट्राचे राज्यपाल हे वारंवार सरकारच्या अधिकारात हस्तक्षेप करत असल्याचं दिसून येत आहे.” असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण बैठक पार पडल्यानंतर आयोजित पत्रकारपरिषदेत बोलताना केलं. तसेच, सरकारने केलेल्या कामांचं परस्पर उद्घाटन केलं जात असल्याचंही यावेळी मलिक यांनी बोलून दाखवलं.

नवाब मलिक म्हणाले, ”महाराष्ट्रात महाविकासआघाडीचं सरकार आल्यानंतर, महाराष्ट्राचे राज्यपाल हे वारंवार सरकारच्या अधिकारात हस्तक्षेप करत असतात, हे दिसून येत आहे. आपल्या माहितीसाठी मी राज्यपालांच्या एका दौऱ्याची माहिती दिली आहे. त्यानुसार राज्यपाल ऑगस्ट रोजी सकाळी विमानाने नांदेडला जात आहेत, त्या दौऱ्याबाबत जो कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. त्यामध्ये दोन कार्यक्रम जे विद्यापीठात होणार आहेत. त्या कार्यक्रमात राज्य सरकारच्या अल्पसंख्याक विभागाने बांधलेले दोन हॉस्टेल आहेत, एक बॉईज आणि एक गर्ल्स हॉस्टेल आहे. याची बांधकामं पूर्ण झाली आम्ही विद्यापीठांकडे ते हॉस्टेल्स अजून वर्ग केलेले नाहीत, हा अधिकार राज्य सरकारचा आहे. त्याचे उद्घाटन करणे आणि मग विद्यापीठाकडे देण्याचा अधिकार हे राज्यपाल महोदय कुलगुरू असताना प्रशासकीय कामं असतील तर त्यांचे अधिकार आहे. पण सरकारने केलेली कामं अल्पसंख्याक विभागाला विचारता, सरकारला विचारता थेट कार्यक्रम आयोजित करून दोन उद्घाटनांचा कार्यक्रमांमध्ये जाहीर करण्यात आलेला आहे.”