रेल्वे पोलिसांनी जप्त केली 14 लाखांची रोकड

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

रेल्वे पोलिसांनी जप्त केली 14 लाखांची रोकड

गोंदिया : गोंदिया रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर जनशताब्दी एक्सप्रेसमध्ये 14 लाख 74 हजार 300 रुपयांच्या रोख रकमेची अवैधरीत्या वाहतूक करणार्या संजू बेहरा (वय 35) रायपूर (छत्तीसगड) येथील रहिवासी याच्या जवळून सदर रक्कम रेल्वे पोलिसांनी जप्त केली.   गोंदिया रेल्वे स्थानकावर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी रेल्वे पोलिसांद्वारे सातत्याने तपास अभियान चालविण्यात येत आहे. त्या अंतर्गत तपासणी गस्त दरम्यान रेल्वे पोलीस यांना गोपनीय माहिती मिळाली की, रायपूरवरून येणार्या जनशताब्धी एक्सप्रेसमध्ये काही संशयास्पद वस्तू नेले जात आहे. ही माहिती मिळताच प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर उभ्या जनशताब्दी एक्सप्रेसमध्ये पेट्रोलिंग सुरू केली. दरम्यान त्यांना एक व्यक्ती संशयास्पद स्थितीत आढळला. त्याची चौकशी केल्यावर त्याने आपले नाव संजू मंगल बेहरा (वय 35) रा. पंडरीतलाई, जिल्हा रायपूर असे सांगितले सदर गाडीने रायपूर जाण्याची माहिती दिली. त्याच्या खांद्यावर असलेल्या बॅगबाबत विचारणा केल्यावर त्याने असमर्थता दाखवत कोणत्याही प्रकारे समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे त्याच्या बॅगची तपासणी करण्यात आली. त्यात 2000, 500, 200 100 रुपयांच्या नोटा आढळल्या. सदर रकमेची मोजणी केल्यावर ते 14 लाख 74 हजार 300 रुपये असल्याचे आढळले. या रकमेच्या मालकी हक्काबाबत त्याने कोणतेही दस्तावेज किंवा पुरावे सादर केले नाही. त्यामुळे पोलीसांनी रोख रकमेसह आरोपीला अटक केली आहे, ही रक्कम अवैध व्यवसायाशी संबंधित असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.